शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: नुडल्सच्या नावाखाली टेम्पो भरून मद्याची वाहतूक, पन्नास लाखांवर मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 16:27 IST

याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

कऱ्हाड : नुडल्सच्या नावाखाली तब्बल ५० लाखांच्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील मालखेड गावच्या हद्दीत सातारच्या उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.ओमकारलाल भगवानलाल मेहता (रा. अदकालीया, जि. उदयपूर, राजस्थान) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू महामार्गावरून गोव्याहून नाशिककडे निघालेल्या टेम्पोमधून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती सातारच्या उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार या पथकाने मंगळवारी कऱ्हाड तालुक्यातील मालखेड गावच्या हद्दीत सापळा रचला. त्यावेळी एक टेम्पो कोल्हापुरहून साताऱ्याच्या दिशेने जाताना या पथकाला दिसला. पथकाने हा टेम्पो अडवला. चालकाकडे चौकशी केली असता टेम्पोच्या हौद्यात नुडल्स असल्याचे त्याने सांगितले. मात्र, पथकाने टेम्पोच्या हौद्याची तपासणी केली असता टेम्पोमध्ये १८० मिली क्षमतेच्या विदेशी दारूच्या १९ हजार २०० बाटल्या, ७५० मिली क्षमतेच्या १ हजार ५०० बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी दारुसह टेम्पो असा ५२ लाख ७८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त डॉ. एच. बी. तडवी व सातारचे अधीक्षक वैभव वैद्य यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक किरण बिरादार, एन. पी. क्षीरसागर, शरद नरळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक महेश मोहिते, नितीन जाधव, सचिन खाडे, संतोष निकम, अजित रसाळ, जीवन शिर्के, किरण जंगम, भीमराव माळी, सचिन जाधव यांनी ही कारवाई केली. दुय्यम निरीक्षक किरण बिरादार तपास करीत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस