शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
5
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
6
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
7
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
8
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
9
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
10
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
11
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
12
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
13
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
14
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
15
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
16
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
17
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
18
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
19
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
20
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरकरात सलग पाचव्या दिवशीही वाहतूक कोंडी, वाहनधारकांमधून संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:00 IST

महामार्गाच्या कोल्हापूर-पुणे मार्गिकेवर पाच किलोमीटरपर्यंत रांगा

मलकापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराडमधील कोल्हापूर नाक्यावर अरुंद रस्ता... त्यातच वाहनांची वर्दळ तर दुसऱ्या बाजूला कृषी प्रदर्शनामुळे वाहनांची गर्दी झालेली होती. यामुळे महामार्गाच्या कोल्हापूर-पुणे मार्गिकेवर दिवसभर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पुणे-मुंबईला जाण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना सुमारे दीड ते दोन तास वाहतूक कोंडीत अडकावे लागले. मलकापूरकरांना सलग पाचव्या दिवशीही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर मलकापूर हद्दीत नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. त्यातच सलग सुट्या संपल्यामुळे पुणे-मुंबईला जाणाऱ्या वाहनांची खूपच वर्दळ वाढली आहे. मलकापुरात सध्या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. या सहापदरीकरणाच्या कामामुळे अचानक बदल करून काही ठिकाणी कोल्हापूर-सातारा लेनवरील वाहतूक उपमार्गावरून वळवलेली आहे. कोल्हापूर नाका ते कोयना पूल परिसरात भराव पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. अरुंद रस्त्यावरून संपूर्ण महामार्गासह पाटण खोऱ्यात जाणारी वाहतूक जाते. त्या ठिकाणी मध्येच एसटीसह खासगी प्रवासी वाहतूक बस व वडापवाले वाहने उभी करून प्रवासी भरत असतात. त्यामुळे कोल्हापूर पुणे लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे. ही वाहतूक कोंडी होऊन कोल्हापूर नाका ते पाचवड फाटा परिसरात पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक कोंडी फोडण्यात महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे दुर्लक्ष व देखभाल विभागाचा गलथानपणा चव्हाट्यावर येत आहे. तर या वाहतूक कोंडीवर पर्याय काढण्यासाठी वाहतूक पोलिसांना पूर्णपणे अपयश येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune-Bangalore Highway Gridlock: Traffic Snarls Plague Malkapur for Fifth Day

Web Summary : Malkapur grapples with severe traffic jams on the Pune-Bangalore highway for five consecutive days. Road construction and increased vehicle volume cause significant delays, frustrating commuters traveling to Pune and Mumbai. Inadequate traffic management exacerbates the congestion.