सातारा-लोणंद मार्गावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST2021-04-06T04:38:18+5:302021-04-06T04:38:18+5:30
वाठार स्टेशन : सातारा-लोणंद राष्ट्रीय मार्गावर सोमवारी दुपारी आरळे गावाजवळ जुने बाभळीचे झाड पडल्याने या रस्त्यावरील वाहतूक दोन तास ...

सातारा-लोणंद मार्गावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत
वाठार स्टेशन : सातारा-लोणंद राष्ट्रीय मार्गावर सोमवारी दुपारी आरळे गावाजवळ जुने बाभळीचे झाड पडल्याने या रस्त्यावरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली.
सर्वाधिक वाहतुकीचा मार्ग अशी ओळख असलेल्या या रस्त्याचे तडवळे फाटा ते वाढे फाटा यादरम्यानचे डांबरीकरण काम पूर्ण झाल्यामुळे सध्या या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सध्या या रस्त्यावरील वाहतूक सुसाट झाली आहे. मात्र, या रस्त्यावर कुठेही गतिरोधक सिग्नल यंत्रणा नसल्याने दररोज या रस्त्यावर अपघात घडत आहेत.
यातच या रस्त्याचे विस्तारीकरण काम थांबल्याने दोनच मोठी वाहने बसत असल्याने या रस्त्यावर सुरक्षित प्रवास करण्यासाठी वाहतूक नियम राबवणे गरजेचे आहे.
रस्त्यावर असलेले अनेक जुनाट वृक्ष रस्त्यावर पडण्यापूर्वी ते तोडण्याची गरज आहे. आज असेच एक बाभळीचे झाड अचानक पडल्याने या रस्त्यावरील सुसाट वाहतूक धीम्यागतीने सुरू राहिली. झाड हटविण्यापूर्वी जवळजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन किलोमीटरपर्यंत वाहने उन्हात उभी असल्याने प्रवासी घामाघूम झाले.
फोटो आहे..
०५वाठार स्टेशन
सातारा-लोणंद राष्ट्रीय मार्गावर सोमवारी दुपारी आरळे गावाजवळ जुने बाभळीचे झाड पडल्याने या रस्त्यावरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती. (छाया : संजय कदम)