बोगदा-शेंद्रे रस्त्यावरील वाहतूक ठरतेय धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:30 IST2021-05-30T04:30:38+5:302021-05-30T04:30:38+5:30
शेंद्रे : सातारा शहरापासून जवळच असणाऱ्या बोगदा-शेंद्रे रस्त्यावरील बोगदा परिसरात असणाऱ्या डोंगरावरील दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. गेल्या ...

बोगदा-शेंद्रे रस्त्यावरील वाहतूक ठरतेय धोकादायक
शेंद्रे : सातारा शहरापासून जवळच असणाऱ्या बोगदा-शेंद्रे रस्त्यावरील बोगदा परिसरात असणाऱ्या डोंगरावरील दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच जोराचा पाऊस झाल्यामुळे बोगद्यापासून जवळच असणाऱ्या डोंगरावरची दरड रस्त्यालगत कोसळलेली आहे. यामुळे या परिसरातील वाहतूक धोकादायक ठरत आहे.
या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच या परिसरात रस्त्याला तीव्र उतार असल्यामुळे वाहनांचा वेग जास्त असतो. दरवर्षी पावसाळ्यात या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. मे महिन्यात झालेल्या पावसामध्येच या परिसरातील डोंगरावरची दरड रस्त्यालगत कोसळली आहे. आतातर थोड्याच दिवसांत पावसाळ्याला सुरुवात होत आहे. येणाऱ्या पावसाळ्यात जोराचा पाऊस झाल्यास या परिसरात डोंगरावरची दरड कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन पावसाळ्याच्या अगोदरच या परिसरात उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
फोटो :
२९शेंद्रे
बोगदा परिसरात पावसाळ्यात डोंगरावरील दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे.
(छाया : सागर नावडकर)