म्हसवड (जि.सातारा) : मध्य प्रदेश, तसेच पुणे येथील ठिबक सिंचनच्या पाइप विक्रेत्यांना मारहाण करून मुद्देमाल लुटणाऱ्या टोळीचा म्हसवड पोलिसांनी अवघ्या बारा तासांत तपास करून लाखो रुपयांचा मुद्देमाल व आरोपींना अटक केली आहे.जनार्दन विलास लोखंडे (रा. गिरझणी, संग्रामनगर, अकलूज, ता. माळशिरस), किरण अभिमान उर्फ अभिमन्यू पवार (रा. संग्रामनगर, अकलूज), विजय गोरख शिंदे (रा. निमगाव टेंभुर्णी, ता. माढा) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.पुणे येथील आरकेड्रीप अँड मल्चिंग प्रोडक्शन, या कंपनीकडून ठिबक सिंचनच्या पाइपच्या मालाची अज्ञात व्यक्तीने ऑर्डर देऊन सदरचा माल हा म्हसवड येथे घेऊन येण्याबाबत कंपनीचे मालक यांना कळवले होते. या अनुषंगाने याचा माल घेऊन तक्रारदार शशिकांत नानाभाऊ वाघ (रा. रांजणी, ता. आंबेगाव, जिल्हा पुणे) हे नारायणगाव पुणे येथून गाडी घेऊन त्यामध्ये ठिबक सिंचनचा पाइप घेऊन म्हसवड येथे आले. त्यानंतर आरोपींनी म्हसवड माळशिरस रोडजवळील भाटकी गावचे माळरानावर गाडी घ्यायला सांगितले. त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी तक्रारदार व त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या सहकाऱ्याला गाडीतून खेचून मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या देऊन गाडीतील सर्व मुद्देमाल उतरवून घेतला. त्यानंतर आरोपींनी पिकअप गाडी बोलवून त्यामध्ये सर्व माल घेऊन गेले होते. याबाबत म्हसवड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक माहितीच्या आधारे, तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता सर्व आरोपी हे सोलापूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीनुसार पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
Web Summary : Mhaswad police swiftly arrested three Solapur criminals for robbing traders from Pune and Madhya Pradesh. The thieves, who posed as customers, stole drip irrigation pipes worth lakhs. Police recovered the stolen goods within twelve hours.
Web Summary : म्हासवड पुलिस ने पुणे और मध्य प्रदेश के व्यापारियों को लूटने वाले सोलापुर के तीन अपराधियों को गिरफ्तार किया। ग्राहकों के रूप में पेश आए चोरों ने लाखों के ड्रिप सिंचाई पाइप चुरा लिए। पुलिस ने बारह घंटे के भीतर चोरी का सामान बरामद कर लिया।