शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ट्रॅक्टर पलटी होऊन चालक जागीच ठार, ओव्हरटेक करताना झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:55 IST

कऱ्हाड : रेठरे खुर्द येथील ओढ्यावरील पुलावरून उसाचा मोकळा ट्रॅक्टर पलटी होऊन खाली पडल्याने चालक जागीच ठार झाला. ही ...

कऱ्हाड : रेठरे खुर्द येथील ओढ्यावरील पुलावरून उसाचा मोकळा ट्रॅक्टर पलटी होऊन खाली पडल्याने चालक जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. संतोष दत्ता जाधव (वय २५, मूळ रा. जालना, सध्या रा. कोकरूड तर्फ माळेवाडी, ता. शिराळा) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. ट्रॅक्टर मालक सत्यजित रावसाहेब सरनोबत (रा. इस्लामपूर) यांनी कऱ्हाड तालुका पोलिसांत दिली आहे.रेठरे बुद्रुक येथील शिवारातील तोडलेला ऊस संतोष जाधव हे ट्रॅक्टर ट्रॉलीतून वाहतूक करत करंगुली येथील निनाईदेवी दालमिया शुगर्स साखर कारखान्यावर गेले होते. मंगळवारी दुपारी करंगुलीकडून रेठरे बुद्रुक येथे येत असताना रेठरे खुर्द येथील कमळाच्या झाडाच्या वळशाजवळ ओढ्यावरील पूल आहे. तेथून उसाच्या बैलगाड्या कृष्णा कारखान्याकडे चालल्या होत्या.याचवेळी जाधव चालवत असलेला ट्रॅक्टर मागे असताना बैलगाड्यांना ओव्हरटेक करून तो पुढे जाताना समोरून अचानक दुसरे वाहन आले असताना चालक संतोष जाधव यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर व दोन ट्रॉली पुलाचा कठडा तोडून ओढ्यात कोसळल्या. त्यात ट्रॅक्टरखाली सापडल्याने संतोष जाधव हे जागीच ठार झाले.यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. संतोष जाधव यांचा मृतदेह कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात सायंकाळी शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. संतोष जाधव यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू