उंब्रजच्या बाजारपेठेत अचानक १२६ जणांची करण्यात आली कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:28+5:302021-06-17T04:26:28+5:30
उंब्रज : येथील बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्र व उंब्रज पोलीस ठाणे व उंब्रज ग्रामपंचायत ...

उंब्रजच्या बाजारपेठेत अचानक १२६ जणांची करण्यात आली कोरोना चाचणी
उंब्रज : येथील बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्र व उंब्रज पोलीस ठाणे व उंब्रज ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने १२६ नागरिक व व्यापारी यांची अचानक रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट व आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ६ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, अशा पद्धतीने यापुढेही गर्दीच्या ठिकाणी अचानक तपासणी मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ संजय कुंभार यांनी सांगितले.
सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी दि. ४ जून रोजी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणून अत्यावश्यक सेवांना सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर उंब्रजच्या बाजारपेठेत भाजीपाल्यासह अन्य वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टिंगचा फज्जा उडाला असल्याचे लक्षात येताच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ संजय कुंभार, डॉ. स्नेहा निकम व उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस उपनिरीक्षक मोहन तलबार यांच्या पथकाने संयुक्तरीत्या बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्या १२६ नागरिकांची तसेच व्यावसायिकांची रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट (रॅट) व आरटीपीसीआर चाचणी केली. यामध्ये ६ जण कोरोनाबाधित मिळून आले. या तपासणी मोहिमेत उंब्रज वैद्यकीय, पोलीस, ग्रामपंचायत प्रशासन यांनी काम पाहिले.
फोटो ओळ:
उंब्रज येथील बाजारपेठेत ‘रॅट’ची तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांच्यासह पोलीस.