उंब्रजसह परिसरात मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:26 IST2021-06-18T04:26:50+5:302021-06-18T04:26:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उंब्रज : कऱ्हाड तालुक्यातील उंब्रज व परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मांड नदीचे पाणी परिसरात शिरले. त्यामुळे ...

उंब्रजसह परिसरात मुसळधार
लोकमत न्यूज नेटवर्क
उंब्रज : कऱ्हाड तालुक्यातील उंब्रज व परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मांड नदीचे पाणी परिसरात शिरले. त्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. तर शेतकऱ्यांचे नदीकाठी असणारे विद्युतपंप वाहून गेले आहेत. दरम्यान, भवानवाडी रस्त्यालगत असलेल्या कोरोना विलगीकरण कक्षाच्या आवारात पाण्याचे तळे निर्माण झाले आहे. मुसळधार पावसाने वीटभट्टी व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
उंब्रज परिसरात बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर गुरूवारी सकाळपर्यंत कायम होता. त्यामुळे कृष्णा, तारळी व मांड नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. नदी, नाले व ओढे पाण्याने तुडुंब भरून वाहू लागले आहेत. ठिकठिकाणी शेतात पाणी साचल्याने पाण्याचे तळे निर्माण झाले आहे. उंब्रजसह परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तर मुसळधार पावसाने वीटभट्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
फोटो दि.१७उंब्रज पाऊस नदी फोटो...
फोटो ओळ : उंब्रज येथील मांड नदीच्या पाणी पातळीत माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. (छाया : अजय जाधव)