शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनमुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:41 IST

कोपर्डे हवेली : सध्या लाॅकडाऊन असल्याने सर्वच उद्योग व्यवसायावर त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा ...

कोपर्डे हवेली : सध्या लाॅकडाऊन असल्याने सर्वच उद्योग व्यवसायावर त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसला आहे. सर्वात जास्त उत्पादन खर्चाचे पीक म्हणून टोमॅटो पिकाकडे पाहिले जाते. उन्हाळी हंगामात टोमॅटोच्या लागणी झाल्या. ते पीक आता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याने आणि लाॅकडाऊनची भीती असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.

तिन्ही हंगामांच्या तुलनेत उन्हाळी हंगामात टोमॅटोचे लागवडीचे क्षेत्र जादा असते. दरही चांगला भेटत असल्याने उत्पादन खर्च जादा करून शेतकरी चांगले पीक आणतात. मार्च, एप्रिल महिन्यात शेतकरी टोमॅटोची लागवड करतात. त्याचे उत्पादन जून महिन्यात सुरू होते. पुणे, अहमदाबाद, मुंबई, बेळगाव आदी बाजारपेठेत टोमॅटो पीक विक्रीसाठी पाठवले जाते. स्थानिक बाजारपेठेत काही शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी पाठवतात. पण, त्याला मर्यादा असते. कराड, चिपळूण या ठिकाणी काही शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी पाठवतात.

मुंबईत टोमॅटोला मागणी चांगली असल्यामुळे कराड तालुक्यातील शेतकरी इतर बाजारपेठेच्याऐवजी मुंबईला टोमॅटो पाठवतात. उन्हाळी हंगामात घेतलेल्या टोमॅटो पिकाचा उत्पादन खर्च एकरी दीड ते दोन लाखापर्यंत असतो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असल्याने जून महिन्यात तो आनलाॅक होईल का ? याविषयी शेतकरी विचारात आहे. शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकासाठी वाहतूक सुरू असली तरी तरी त्याला मर्यादा पडत आहेत. सध्या काही ठिकाणच्या लहान मोठ्या भाजी मंडई बंद असल्याने त्याचा तोटा शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे‌. लाॅकडाऊनमुळे अनेक कार्यक्रम तसेच हाॅटेल व्यवसाय बंद असल्याने भाजीपाला व्यवसाय तोट्यात सुरू आहे. सर्वात जास्त उत्पादन खर्च करून टोमॅटोचे पीक शेतकरी घेतात. त्यामुळे या लाॅकडाऊनची चिंता सतत शेतकऱ्यांना सतावत आहे.

कोट

आम्ही प्रत्येक वर्षी उन्हाळी हंगामात टोमॅटोचे उत्पादन घेत असतो. प्रत्येक वर्षी उत्पादन खर्चात वाढ होत आहे. सध्या लाॅकडाऊन असल्याने आमच्या चिंतेत भर पडली आहे‌. यंदा दोन एकर क्षेत्रावर टोमॅटोचे पीक घेतले आहे‌. त्याला तीन लाखांपेक्षा अधिक खर्च झाला आहे. भविष्यात लाॅकडाऊन राहिले तरी शेतकऱ्यांच्या मालाची विक्रीच्या व्यवस्थेसाठी शासनाने नियोजन करावे.

भाऊसाहेब चव्हाण, टोमॅटो उत्पादक शेतकरी

कोपर्डे हवेली

चौकट

कराड तालुक्यात कोपर्डे हवेली, नडशी, पार्ले, विंग, काले, शिरवडे, उत्तर कोपर्डे आदी गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी हंगामात टोमॅटोचे उत्पादन घेत असतात.