शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

उदयनराजेंचा आज 51वा वाढदिवस, जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या या 'दहा रंजक' गोष्टी

By सचिन जवळकोटे | Updated: February 24, 2018 12:56 IST

राजकारण अन् समाजकारण यात कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू पाहणारे उदयनराजे यांचा आज 51वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या दहा जगावेगळ्या गोष्टी.. अर्थात उदयनराजे टॉप टेन !

ठळक मुद्दे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अन्  भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआज शनिवारी एकाच व्यासपीठावर एकत्र येताहेत.उदयनराजे स्मार्टफोन वापरतात, मात्र 'व्हॉट्स अॅप' बिलकुल नाही. '

सातारा - सध्या जाहीर कार्यक्रमांममधून एकमेकांवर प्रचंड टीका करणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अन्  भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआज शनिवारी एकाच व्यासपीठावर एकत्र येताहेत. ही किमया साधलीय साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी. राजकारण अन् समाजकारण यात कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू पाहणारे उदयनराजे यांचा आज 51वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या दहा वेगळ्या गोष्टी.. अर्थात उदयनराजे टॉप टेन !

1) उदयनराजे स्मार्टफोन वापरतात, मात्र 'व्हॉट्स अॅप' बिलकुल नाही. 'मी व्हॉट्स अॅप नाय तर व्हॉटस डाऊन बघतो,' असं मोठ्या अभिमानानं सांगणारे उदयनराजे 'डाऊन टू अर्थ' राजकारण करण्यावर अधिक भर देतात.

2) 'मला महाराज म्हणू नका. महाराज फक्त छत्रपती शिवाजीराजे ,' असं कळवळून सांगणाऱ्या उदयनराजेंना साताऱ्यातील तरुणाई 'लाडकं मालक' म्हणून मोठ्या कौतुकानं संबोधते.

3) 'जिप्सी अन् बुलेट' ही उदयनराजेंची खास आवडती वाहनं. रस्त्यावर एखाद्या कार्यकर्त्याची बुलेट दिसली तर स्वतःच्या कोट्यवधी रुपयांच्या महागड्या गाडीतून उतरून 'बुलेट सवारी' करायला ते मागेपुढे पाहत नाहीत.

4) आपल्या कोणत्याही वाहनाचा नंबर 007 हाच असावा, यावर त्यांचा अधिक भर असतो. तीच क्रेझ त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही असल्यानं जेव्हा 007 क्रमांकाच्या असंख्य गाड्या शहरातील रस्त्यांवरून फिरू लागतात, तेव्हा सातारकर ओळखतात की उदयनराजे आलेत.

5) शेतकऱ्याची बैलजोडी हा उदयनराजेंचा जिव्हाळ्याचा अन् आवडता विषय. एखाद्या शेतात बैलं दिसली तर गाडीतून उतरून थेट शिवारात जाऊन त्यांच्यावर माया करायला खूप आवडतं.

6) साताऱ्यातील त्यांचे अनेक चाहते नवी गाडी घेतली की थेट 'जलमंदिर' गाठतात. शिव वंशजांच्या या राजवाडा परिसरात राजेंनी स्वतः गाडी चालविली तरच कार्यकर्त्यांचं समाधान होतं. या हट्टापायी कधी-कधी एखाद्या शेतकऱ्याचा नवा कोरा ट्रॅक्टर चालवण्याचीही हौस त्यांना पूर्ण करावी लागते.

7) 'छत्रपती शिवरायांचे वंशज' म्हणून जुन्या काळातील पिढीला राजेंबद्दल भलतंच अप्रूप. कधी तरी भेट झाल्यानंतर राजेंच्या गालावरून हात फिरवून अन् बोटं मोडून त्यांची नजर काढणारी जुनी पिढी आजही साताऱ्यात पाहायला मिळते.

8) रस्त्यावरून चालत जाणारी शाळकरी मुलं दिसली तर ते स्वतःच्या महागड्या गाडीत या सर्व मुलांना बसवतात..नंतर त्यांना त्यांच्या शाळेपर्यंत किंवा कॉलेजपर्यंत पोहोचवितात.

9) 'तलवार अन् पिस्तूल' ही त्यांची आवडती शस्त्रं. 'जेम्स बॉन्ड'च्या स्टाइलमध्ये पिस्तूल रोखलेलं त्यांचं छायाचित्र मध्यंतरी भलतंच व्हायरल झालं होतं. 

10) आवडत्या कार्यकर्त्याला जवळ घेऊन त्याच्या 'गालाचा मुका' घेणं अन् त्याला 'लव्ह यू' म्हणणं, ही त्यांची खासियत. कॉलर उडविण्याची त्यांची अदाकारी तर महाराष्ट्रातील लाखो तरुणांना घायाळ करून टाकणारी.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर