कऱ्हाडला आज तंत्रस्नेही शिक्षकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:30 IST2021-05-30T04:30:12+5:302021-05-30T04:30:12+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील आहेत, तर प्रमुख पाहुणे आमदार पृथ्वीराज चव्हाण आहेत. कार्यक्रमास जिल्हा परिषद ...

Today, Karhad is proud of its tech-savvy teachers | कऱ्हाडला आज तंत्रस्नेही शिक्षकांचा गौरव

कऱ्हाडला आज तंत्रस्नेही शिक्षकांचा गौरव

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील आहेत, तर प्रमुख पाहुणे आमदार पृथ्वीराज चव्हाण आहेत. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, सदस्य उदयसिंह पाटील, कऱ्हाड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्यासह मान्यवर सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमात गुगल अ‍वाॅर्ड विजेते बालाजी जाधव व एशियन एज्युकेशन अ‍वाॅर्ड विजेते महेश लोखंडे या तंत्रस्नेही शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे.

Web Title: Today, Karhad is proud of its tech-savvy teachers