सातारा : पालिकेच्या प्रशासनाविरूद्ध आरोग्य सभापती वसंत लेवे आणि नगरसेविका सुनीता पवार यांनी बुधवारी दुपारी पालिकेच्या दालनात उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण अतिक्रमण काढेपर्यंत सुरूच राहणार असून, या उपोषणला विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनीही पाठींबा दिला आहे.
अतिक्रमण हटविण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांवरच उपोषणाची वेळ
सातारा : पालिकेच्या प्रशासनाविरूद्ध आरोग्य सभापती वसंत लेवे आणि नगरसेविका सुनीता पवार यांनी बुधवारी दुपारी पालिकेच्या दालनात उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण अतिक्रमण काढेपर्यंत सुरूच राहणार असून, या उपोषणला विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनीही पाठींबा दिला आहे.
राजवाडा येथील अभयसिंहराजे भोसले संकुलात अतिक्रमण झाल्याचा आरोप करत आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती. या अतिक्रमणाला पालिकेतील काही नगरसेवकांचाच पाठींबा असल्याचाही त्यांनी आरोप केला होता. मात्र पालिका प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आरोग्य सभापती वसंत लेवे आणि नगरेसविका सुनीता पवार यांनी बुधवारी दुपारी पालिकेत उपोषणास सुरूवात केली आहे.
जोपर्यंत संकुलातील अतिक्रमण काढले जात नाही. तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका वसंत लेवे यांनी घेतली आहे. दरम्यान, पालिकेच्या कर्मचाºयांनीही आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केल्यामुळे पालिकेचे कामकाज ठप्प झाले होते. पालिकेत बुधवारचा दिवस आंदोलन डे म्हणून पाहायला मिळाला
Web Title: The time to fast on the ruling councilors to remove encroachment