पाटण तालुक्यात विद्यार्थ्यांसह गुरुजींवरही डोंगरं ओलांडण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:57 IST2017-12-06T00:55:38+5:302017-12-06T00:57:00+5:30

पाटण तालुक्यात विद्यार्थ्यांसह गुरुजींवरही डोंगरं ओलांडण्याची वेळ
प्रवीण जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटण : पाटण तालुक्यात दहापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या ११९ शाळांच्या विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांवर समायोजनाची टांगती तलवार आहे़ या शाळातील विद्यार्थ्यांचे नाव एक किलोमीटर अंतर असणाºया जवळच्या शाळेत दाखल करण्यात येणार आहे. यामुळे डोंगरदºयातील शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या समोर अडचणी वाढल्या आहेत़
पाटण तालुका हा डोंगराळ असून, त्याची भौगालिक रचना पाहता खूपच दुर्गम असा हा तालुका आहे़ या तालुक्यात डोंंगरदºयातील वाडी-वस्तीवर जीवनाचे शिक्षण देण्यासाठी पूर्वीच्या असणाºया जीवन शिक्षण विद्यामंदिरातून हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या पायावर उभे राहून गावाचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे़. परंतु आताच्या जिल्हा परिषदेच्या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थी संख्या कमी असलेल्या प्राथामिक शाळांचे समायोजन करण्याचा शासनाच्या निर्णयामुळे दुर्गम असणाºया तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे़ यामुळे तालुक्यातील ११९ शाळांमधून शिक्षण घेणाºया ८२१ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात सापडले आहे़
तालुक्यातील ११९ शाळांपैकी काळेवाडी (आडूळ), डाकेवाडी (मत्रेवाडी), महाडिकवाडी (तारळे) याबरोबरच पुनर्वसन झालेल्या घोटील शाळा क्रमांक दोन या चार शाळांची माहिती शासनाने परत मागविली आहे़ या चार शाळांचे गुगल मॅपद्वारे दोन शाळांमधील अंतराबरोबरच दोन शाळांमधील नैसर्गिक अडथळा आहे का? या व्यतिरिक्त दुसरी कोणती अडचण आहे का? याबाबत शासनाने अहवाल मागविला असून, त्यांनतरच या शाळा समायोजनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे़
पाटण तालुक्यात झेडपीच्या एकूण ५३२ शाळा असून, त्यापैकी ११९ शाळांचे समायोजन हे एक किलोमीटर अंतर असणाºया जवळच्या शाळेत करण्यात येणार आहे़; परंतु पाटण तालुक्याची भौगोलिक रचना पाहता दोन शाळांमधील अंतर हे एक किलोमीटरपेक्षा जास्त आहे़ या ११९ शाळांचे समायोजन केले तर या डोंगरदºयातील ११९ जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेणाºया ८२१ विद्यार्थी- विद्यार्थिंनी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत़