बोकड-माकडानंतर आता वाघ-मांजर !

By Admin | Updated: April 6, 2015 01:20 IST2015-04-06T01:20:27+5:302015-04-06T01:20:44+5:30

राजेसंघर्ष टोकाला : राजघराण्याच्या वादात पालकमंत्र्यांचीही ‘एन्ट्री’

Tiger-cat now after the goose-monkey! | बोकड-माकडानंतर आता वाघ-मांजर !

बोकड-माकडानंतर आता वाघ-मांजर !

सातारा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला ‘राजेसंघर्ष’ टोकाला गेलेला असतानाच पालकमंत्री विजय शिवतारे यांनीही यात रविवारी ‘एन्ट्री’ केली. ‘मला अस्वल म्हणणाऱ्या रामराजेंना अस्वल व वाघ यामधील फरकही समजत नाही. त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे,’ असा टोमणा शिवतारे यांनी लगावला आहे.
विधान परिषद सभापती रामराजे व खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्रक युद्धात आजपावेतो ‘माकड, बोकड व अस्वल’ आदी प्राणी गाजले होते; मात्र शिवतारे यांनी काढलेल्या पत्रकात ‘वाघ व मांजर’ यांचाही समावेश झाला आहे. शरद पवारांच्या ताटाखालचे मांजर बनून रामराजे राजकारण करत असल्याचाही आरोप त्यांनी या पत्रकात केला आहे. दरम्यान, रविवारीही रामराजे व उदयनराजे यांनी पुन्हा शाब्दिक आसूड ओढले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Tiger-cat now after the goose-monkey!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.