महाबळेश्वरात पर्यटकांचा महापूर

By Admin | Updated: May 30, 2016 01:00 IST2016-05-29T22:14:49+5:302016-05-30T01:00:09+5:30

बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप : नौकाविहारासाठी पर्यटकांच्या रांगा; वाहतूक कोंडीमुळे नाराजी

Thunderstorms of Mahabaleshwar | महाबळेश्वरात पर्यटकांचा महापूर

महाबळेश्वरात पर्यटकांचा महापूर

महाबळेश्वर : सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाच महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे सायंकाळनंतर दाट धुके पसरत आहे. या वातावरणाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी महाबळेश्वर व पाचगणीत पर्यटकांचा महापूर उसळला असून, उन्हाळी सुटीचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आल्याने बाजारपेठ व सर्वच प्रेक्षणीय स्थळे गर्दीने फुलून गेली आहेत. शनिवार-रविवारी तर महाबळेश्वर ते पाचगणी या मुख्य मार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.
महाराष्ट्रात सर्वत्र तापमानाचा पारा वाढत असताना महाबळेश्वरमध्ये मात्र पर्यटक ऐन उन्हाळ्यात दाट धुक्याचा अनुभव घेत आहेत. महाबळेश्वरमध्ये विविध राज्यांमधून विशेषत: गुजरात राज्यामधून येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असून, सध्या येथील प्रसिद्ध वेण्णा
तलाव येथे नौकाविहारासाठी पर्यटकांची गर्दी ओसंडूनहॉटेल्स व बंगले हाउसफुल झाल्याने पर्यटकांना भिलार, वाई या ठिकाणी मुक्काम करावा लागत आहे. बाजारपेठेते खरेदी-विक्रीतून
दररोज कोट्यवधींची उलाढाल होत आहे. (प्रतिनिधी)

चार दिवसांत दहा लाखांचा भरणा
महाबळेश्वरला येणारा प्रत्येक पर्यटक येथील वेण्णा तलावात नौकाविहाराचा आंनद लुटतो. नौकाविहारासाठी येथे पर्यटकांची रांगच रांग लागते. गेल्या चार दिवसांमध्ये वेण्णा तलाव येथे तब्बल १० लाख रुपये शुल्क जमा झाले आहे. नौकाविहार करण्यासाठी बोटींची संख्या कमी पडत आहे. याठिकाणी नगरपालिकेचे २६ कर्मचारी कार्यरत असून, ४० कर्मचारी टेंडरवर काम करीत आहे. येथे रोइंग बोटींची संख्या ४० तर ५० पॅडल बोटी असून, १० बोटी बंदावस्थेत आहेत.

Web Title: Thunderstorms of Mahabaleshwar