शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

पुणे-बंगळुरू महामार्गावर द बर्निंग बसचा थरार, ३५ प्रवासी बचावले; दीड तास लेन बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 14:22 IST

टायर पेटल्याने बसला आग लागली आणि बघता-बघता संपूर्ण बस पेटली

मलकापूर : मुंबईहून इचलकरंजीकडे येणाऱ्या चालत्या खासगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याने महामार्गावर द बर्निंग बसचा थरार झाला. पुणे - बंगळुरू महामार्गावर विरवडे गावच्या हद्दीत ही घटना घडली. या आगीत बसच्या टायरसह पाठीमागील भाग जळून खाक झाल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे ३५ प्रवाशांचा जीव वाचवल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, अग्निशामक बंबाच्या साह्याने दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. तोपर्यंत महामार्गाच्या सातारा - कोल्हापूर लेनवरील वाहतूक ठप्प झाली होती.घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय ट्रॅव्हल्स कंपनीची बस (एमएच ०९ एफएल ०७८९) ३५ प्रवासी घेऊन मुंबईहून इचलकरंजीकडे येत होती. पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल्स वराडे गावच्या हद्दीत आली असता पाठीमागील टायरला आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. चालकाने प्रसंगावधान राखत बस महामार्गाच्या कडेला थांबवली. टायर पेटल्याने बसला आग लागली आणि बघता - बघता संपूर्ण बस पेटली. बसमधून ३५ प्रवासी मुंबई ते इचलकरंजी असा प्रवास करत होते. त्या सर्व प्रवाशांना पेटलेल्या बसमधून सुरक्षितरीत्या खाली उतरवण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलिस स्टेशनचे कर्मचारी तसेच महामार्ग देखभाल कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, कऱ्हाड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचा बंब बोलावण्यात आला. या अग्निशामक दलाच्या साह्याने बसला लागलेली आग दोन तासांच्या प्रयत्नाने विझविण्यात आली. बसने पाठीमागील बाजूने पेट घेतला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याने वळवण्यात आली होती. अग्निशामक दलाकडून आग विझविण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.ब्रेक लायनर गरम झाल्याने आग?मुंबई ते इचलकरंजी ३५ प्रवासी घेऊन येत असताना वराडे गावाजवळ बसच्या मागील चाकाचे ब्रेक लायनर गरम होऊन धूर येऊ लागल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. तळबीड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बसमधील प्रवासी व साहित्य बसमधून सुरक्षित उतरवले. ब्रेक लायनर गरम झाल्याने आग लागली, अशी घटनास्थळी चर्चा होती. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातfireआग