दिव्यनगरीत तीन दुचाकी जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:28 IST2021-05-28T04:28:54+5:302021-05-28T04:28:54+5:30

सातारा : येथील शाहूपुरीलगत असणाऱ्या दिव्यनगरीमध्ये गुरुवारी मध्यरात्री अज्ञातांनी तीन दुचाकींना आग लावली. या आगीत तिन्हीही दुचाकी जळून खाक ...

Three two-wheelers caught fire in Divyanagar | दिव्यनगरीत तीन दुचाकी जाळल्या

दिव्यनगरीत तीन दुचाकी जाळल्या

सातारा : येथील शाहूपुरीलगत असणाऱ्या दिव्यनगरीमध्ये गुरुवारी मध्यरात्री अज्ञातांनी तीन दुचाकींना आग लावली. या आगीत तिन्हीही दुचाकी जळून खाक झाल्या. या घटनेमुळे खळबळ उडाली असून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दिव्यनगरीमधील शिवकृपा काॅलनीतील जंगम यांच्या घराच्या पार्किंगमध्ये तीन दुचाकी पार्क केल्या होत्या. गुरुवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास अज्ञाताने या दुचाकींना आग लावली. अचानक धुराचे लोट व आग दिसू लागल्यानंतर नागरिकांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. तोपर्यंत तिन्हीही दुचाकी जळून खाक झाल्या. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. शाहूपुरी पोलिसांना याची माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी सुरू केली आहे.

याबाबत अनिल जोसेफ तडाखे (४५) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: Three two-wheelers caught fire in Divyanagar