शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Satara: डोक्यात गोळी झाडून खून करणारे तिघे अल्पवयीन ताब्यात, चोवीस तासांत खुनाचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 16:35 IST

संशयित आरोपी पुण्यात असल्याचे समजताच पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

सातारा : येथील नटराज मंदिरासमोर अर्जुन मोहन यादव (वय २६, रा. लाखानगर, वाई, जि. सातारा) याचा डोक्यात गोळी घालून खून करणाऱ्या तिघा अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासांत ताब्यात घेतले. त्यांनी खून कोणत्या कारणातून व कशासाठी केला, हे अद्याप समोर आले नसून पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, वाई शहरातून तडीपार असलेला अर्जुन यादव हा शनिवारी (दि.२) दुपारी साडेतीनच्या सुमारास नटराज मंदिराजवळ आला होता. यावेळी अज्ञातांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडून त्याचा खून केला. या घटनेनंतर साताऱ्यात प्रचंड खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने आरोपींना अटक करा, असे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.या खुनानंतर एलसीबीची टीम दोन भागात विभागून विविध ठिकाणी रवाना झाली. त्यापैकी पुण्याला गेलेल्या पथकाला या खूनप्रकरणामध्ये तीन अल्पवयीन मुले असल्याचे समजले. ही तिन्हीही मुले पुण्यात असल्याचे समजताच या पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. यामध्ये आणखी दोघांचा समावेश असल्याचे तपासात पुढे येत असून, संबंधित दोघे फरार आहेत.एलसीबी टीमचे कौतुक अन् बक्षीसहीकेवळ चोवीस तासांत या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी एलसीबी टीमचे काैतुक करून त्यांना बक्षीसही जाहीर केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस