मेरुलिंग घातातील अपघातात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:36 IST2021-04-26T04:36:19+5:302021-04-26T04:36:19+5:30

कुडाळ : जावली तालुक्यातील मेरुलिंगच्या घाटात रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास कार दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच ...

Three killed in Meruling accident | मेरुलिंग घातातील अपघातात तिघांचा मृत्यू

मेरुलिंग घातातील अपघातात तिघांचा मृत्यू

कुडाळ : जावली तालुक्यातील मेरुलिंगच्या घाटात रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास कार दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी रेशनिंग आणण्यासाठी कारमधून जात असताना मेरुलिंग घाटात एका अवघड वळणावर कार थेट दरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेत जखमींना बाहेर काढले. या अपघातात कारमधील कारचालक शिवाजी जगन्नाथ साबळे (वय ४०), लिलाबाई गणपत साबळे (५५), आणि सागर सर्जेराव साबळे (३२) या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत.

२५मेरुलिंग अपघात

Web Title: Three killed in Meruling accident