शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

आगाशिवनगर झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट, तीन झोपड्या जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 1:04 PM

आगाशिवनगर, ता. कऱ्हाड  येथील झोपडपट्टीतील दांगटवस्तीत अचानक लागलेल्या आगीत सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये तीन झोपड्या जळून खाक झाल्या. मंगळवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. मात्र, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही.

ठळक मुद्दे आगाशिवनगर झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट तीन झोपड्या जळून खाक: सुदैवाने जिवितहानी टळली

मलकापूर : आगाशिवनगर, ता. कऱ्हाड  येथील झोपडपट्टीतील दांगटवस्तीत अचानक लागलेल्या आगीत सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये तीन झोपड्या जळून खाक झाल्या. मंगळवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. मात्र, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दांगटवस्ती येथील झोपडपट्टीत ४ राहणारे कुटुंबीय नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून कामावर गेले होते. यावेळी मंगळवारी अचानक झोपडीतील पत्र्याच्या शेडच्या घरातून धूर येत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. काही कळण्यापूर्वीच झोपडीत सिलेंडरचा अचानक स्फोट झाला.स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी घटना घडलेल्या घराशेजारी असलेल्या इतर घरांतील सिलेंडर प्रसंगावधान राखून युवकांनी बाहेर काढले. तसेच आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

या घटनेची माहिती कऱ्हाड पालिका व कृष्णा रूग्णालयातील दोन अग्निशामक दलास दिली. त्यानंतर अग्निशामक दलासोबत लगतच्या एका कंपनीतील अग्निशामक यंत्रणेद्वारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली गेली. यावेळी युवकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने पुढील अनर्थ टळला.

टॅग्स :fireआगSatara areaसातारा परिसर