शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी, फलटणमध्ये खासगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 14:18 IST

पाच टक्के व्याज दराने दरमहा दहा हजार रुपये रक्कम नुसार आतापर्यंत सहा लाख रुपये मोहिते यास व्याजापोटी दिले

फलटण : खासगी सावकारीमधून लिहून घेतलेल्या जमिनीचा ताबा दिला नाही, म्हणून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन शिवीगाळ करणाऱ्या खासगी सावकाराविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून दिलेल्या माहितीनुसार, कैलास दादासाहेब मिंड (रा. टाकळवाडे ता. फलटण) यांनी २०१४ ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये फलटण येथील सोमवार पेठेतील खासगी सावकार भगवान नामदेव मोहिते यांच्याकडून भाचीच्या लग्नाकरिता पैशाची आवश्यकता असल्याने पैशाची मागणी केली होती.खासगी सावकार भगवान मोहिते याने  मिंड यांच्याकडून जमीन लिहून द्यावी लागेल असे म्हणून साठेखत व दस्त करून घेतला. त्याबदल्यात २ लाख १० हजार रुपये रोख रक्कम साठेखत दस्त व कूळ कायद्याच्या खर्चापोटी लावली होती. मिंड यांनी नोव्हेंबर २०२१ पर्यंत पाच टक्के व्याज दराने दरमहा दहा हजार रुपये रक्कम नुसार आतापर्यंत सहा लाख रुपये मोहिते यास व्याजापोटी दिले होते.तरीसुद्धा जमिनीचा ताबा दिला नाही म्हणून  खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन मोहिते शिवीगाळ करीत असल्याची फिर्याद कैलास दादासाहेब मिंड यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार खासगी सावकार भगवान नामदेव मोहिते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी