शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हजारो रेल्वेगाड्या धावताहेत खासगी जागेतून; पुणे-मिरज दुहेरी मार्गासाठी तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 19:47 IST

सातारा : ब्रिटिशकाळा पासून शिस्तीत चाललेली यंत्रणा म्हणून बोलबाला असलेली रेल्वे जिल्ह्यातील अनेक गावांमधून खासगी जागेतून धावत आहे. १९६८-६९ दरम्यान पुणे-मिरज ब्रॉडगेज रेल्वे लाईन गेली असून, त्याची कोणत्याच सातबारावर नोंद नाही. बाधित शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यां कडे धाव घेतली.कोपर्डे हवेली, शिरवडे, खराडे, पार्ले, ...

सातारा : ब्रिटिशकाळापासून शिस्तीत चाललेली यंत्रणा म्हणून बोलबाला असलेली रेल्वे जिल्ह्यातील अनेक गावांमधून खासगी जागेतून धावत आहे. १९६८-६९ दरम्यान पुणे-मिरज ब्रॉडगेज रेल्वे लाईन गेली असून, त्याची कोणत्याच सातबारावर नोंद नाही. बाधित शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

कोपर्डे हवेली, शिरवडे, खराडे, पार्ले, कालगाव, तारगाव, नलवडेवाडी, टकले, बोरगाव, नहरवाडी, रहिमतपूर येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे-मिरज ही रेल्वेलाईन १९६८-६९ च्या दरम्यान गेली आहे. रेल्वे प्रशासन किंवा शासनाकडून या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या शेतजमिनीचा मोबदला दिलेला नाही. कोणताही शासकीय प्रकल्प उभारताना संपादित शेतजमिनीच्या सात बारा व फेरफार उताºयावर संबंधित प्रकल्पाचा उल्लेख करून संपादित क्षेत्र उताऱ्यातून कमी केले जाते.

नहरवाडी, रहिमतपूर येथील संपादित क्षेत्राचा सातबारा, फेरफारवर कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही. तसेच सातबारावरून क्षेत्र कमीही केलेले नाही. सर्व शेतकरी शासनाचा महसूल भरत आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या भूसंपादनाच्या कामकाजाबाबत सर्व शेतकऱ्यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.

परिसरातील बागायती क्षेत्रामध्ये मध्य रेल्वेने लोहमार्गापासून पश्चिम दिशेला चाळीस ते ऐंशी मीटर अंतरावर खांब रोवले आहेत. हे क्षेत्र संपादित करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची नोटीस अथवा पूर्वसूचना रेल्वे विभागाने दिली नाही. तसेच या क्षेत्राचे सर्व्हे पूर्ण न करता प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे. या कामासंबंधित नकाशे, संपादनाची कागदपत्रे रेल्वे विभागाकडे मागितली असता ती न देता भूमी संपादनाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. रेल्वेच्या हद्दीची मर्यादा रेल्वे कार्यालयाकडे नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर भूमिसंपादन समन्वय सातारा शाखा यांच्यामार्फत पुणे, कऱ्हाड येथीळ वरिष्ठ विभाग अभियंता कार्यालयानेही पत्र स्वीकारलेले नाही, असेही पत्रात म्हटले आहे.दुहेरीकरणातील नुकसानभरपाईसाठी बैठकपुणे-मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम हाती घेतले आहे. हे काम करण्यास कोणाचाही विरोध नाही; पण यामध्ये जाणार असलेल्या जमिनीची नोंद सातबारावर करावी. तसेच शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

शासनाच्या प्रकल्पात जमिनी गेल्यास नुकसान भरपाई, कुटुंबातील एकाला नोकरी देणे अपेक्षित आहे; पण रेल्वेकडून यातील कोणताही लाभ शेतकºयांना मिळालेला नाही.- मनोज ढाणे रहिमतपूर

टॅग्स :Satara areaसातारा परिसरrailwayरेल्वे