शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

सीतामाईच्या साक्षीनं हजारो सुवासिनींनी घेतला अखंड सौभाग्याचा वसा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 5:00 PM

तीळ नव्हे हलवा, येता जाता बोलवा.., तीळ गूळ घ्या, गोड बोला, वसा घ्या वसा.. अखंड सौभाग्याचा वसा... अशा एक ना अनेक भावोद्गारांनी मंदिर परिसर दणाणून सोडला.

चाफळ (सातारा) : तीळ नव्हे हलवा, येता जाता बोलवा.., तीळ गूळ घ्या, गोड बोला, वसा घ्या वसा.. अखंड सौभाग्याचा वसा... अशा एक ना अनेक भावोद्गारांनी मंदिर परिसर दणाणून सोडला. समर्थ रामदास स्थापित पाटण तालुक्यातील चाफळ येथील श्रीराम मंदिरात रविवारी सीतामाईच्या साक्षीनं हजारो सुवासिनींनी अखंड सौभाग्याचा वसा घेतला.तीर्थक्षेत्र चाफळ येथील श्रीराम मंदिरात १९८४ पासून सीतामाईची यात्रा भरवली जाते. या उत्सवास यंदा तीस वर्षे होत आहेत. मकरसंक्रांतीला सीतामाईचे दर्शन घेऊन वसा घेतल्यास सौभाग्य अखंड टिकते, अशी महिलांची श्रद्धा आहे. त्यामुळे या उत्सवास अनन्य साधारण महत्त्व आहे.सीतामाई उत्सवासाठी रविवारी सकाळपासूनच मंदिर परिसरात महिलांनी गर्दी केली होती. दुपारी महिलांच्या संख्येत वाढ होत गेल्याने महिला मिळेल त्या ठिकाणी विडे मांडून पूजा करत होत्या. वसा घेत असताना महिला सुगडीमध्ये तीळ, गाजर, बोरे, गूळ, ऊस, शेंगा, हरभरा, पावटा, हळदी-कुंकू घेऊन श्रद्धापूर्वक सीतामाईच्या साक्षीने खाऊच्या पानावर खोबरे, खारीक, सुपारी ठेवून पाच सौभाग्यवतींच्या हातून ओटीत घालत होत्या. त्यामुळे मंदिर परिसरात सुगड्यांचा जागोजागी खच पडला होता.सीतामाईचे दर्शन व्यवस्थित घेता यावे म्हणून श्रीराम मंदिर व्यवस्थापनाने बेरिगेटस उभारून व्यवस्था केली होती. यात्रेसाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातून एसटीची सोय केली होती. महिलांना दर्शनासाठी ओळीने मंदिरात सोडण्यासाठी समर्थ विद्या मंदिर विद्यालयाचे सुनील सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आरएसपीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी अथक परिश्रम घेत होते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उंब्रजचे पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनासाठी शंभर कर्मचाºयांचा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर