शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: वणव्याच्या भडक्याने मान्याचीवाडी येथील हजारो हेक्टर क्षेत्र खाक, गावाच्या दिशेने झेपावणारा वणवा ग्रामस्थांनी रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:21 IST

देशी प्रजातीच्या झाडांबरोबर औषधी वनस्पतींचीही मोठी हानी

ढेबेवाडी : अज्ञाताने लावलेल्या वणव्याचा भडका उडाल्याने पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी येथील शेकडो एकर क्षेत्र जळून खाक झाले. तर तब्बल पाच तास मान्याचीवाडी येथील नागरिकांनी आगीशी संघर्ष करून नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, यामुळेच गावाच्या दिशेने झेपावणारी आग थोपवण्यात यश आले; मात्र तोपर्यंत हजारो झाडे होरपळल्याने मोठे नुकसान झाले.ढेबेवाडी विभागातील डोंगररांगांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अज्ञातांकडून वणवा लावण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे डोंगराच्या बाजूला असणाऱ्या अनेक गावांना याची झळ पोहोचत आहे. दोन दिवसांपूर्वी मस्करवाडी या ठिकाणी डोंगरात लावलेला वणवा आंब्याच्या बागेमध्ये घुसल्याने सुमारे दीड हजार झाडे होरपळली. त्याचबरोबर या विभागात असलेले डोंगर परिसरातील वनविभागाचे हजारो हेक्टर क्षेत्रातील वनसंपत्तीचे वणव्यामुळे नुकसान झाले आहे. यामध्ये देशी प्रजातीच्या झाडांबरोबर औषधी वनस्पतींचीही मोठी हानी झाली आहे.

मान्याचीवाडीनजीकच्या शिवारात गुरुवारी दुपारच्या सुमारास वणवा लागल्याचे येथील नागरिकांच्या निदर्शनास आले. दुपारच्या सुमारास लागलेल्या या वणव्याचा भलताच भडका उडाला. हा-हा म्हणता संपूर्ण शिवारात वणवा पसरला. यामध्ये शिवारात असलेला चारा तसेच पिकांचेही मोठे नुकसान झाले तर शिवारात असलेल्या आंबा, चिकू त्याचबरोबर देशी प्रजातीच्या झाडांचेही होरपळून मोठे नुकसान झाले. शिवारामध्ये असलेले चाऱ्याचे गवत सुकलेले असल्याने वणव्याचा मोठा भडका उडाला.प्रचंड वेगाने गावाचे दिशेने झेपावत असलेल्या वणव्याला येथील महिला पुरुषांसह तरुणांनी थोपविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी घरातून त्याचबरोबर काही बोअरवेलच्या माध्यमातून पाणी उपसून या वणव्यावर मात करण्याचा तब्बल पाच तास प्रयत्न केला. यावेळी संपूर्ण गावाच्या दिशेने झेपावणारा वणवा पाच तासांनंतर थोपवण्यात ग्रामस्थांना यश आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग