दोन हजार प्राणी, पक्ष्यांचा वाहनांखाली चिरडून मृत्यू
By Admin | Updated: June 5, 2014 00:04 IST2014-06-05T00:04:15+5:302014-06-05T00:04:28+5:30
नऊ वर्षांचे निरीक्षण : पंचवीस कि.मी.त गमावले जीव

दोन हजार प्राणी, पक्ष्यांचा वाहनांखाली चिरडून मृत्यू
संजय पाटील ल्ल कºहाड अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक असणार्या प्राणी, पक्ष्यांना मानवनिर्मित कारणांमुळे आपला जीव गमवावा लागतोय. पिकांवरील औषध फवारणी, नष्ट होणारी वसतिस्थाने, शिकार आदी कारणास्तव प्राणी, पक्ष्यांवर मृत्यू ओढवतोय. त्याचबरोबर वाहनांच्या धडकेतही दरवर्षी शेकडो प्राणी-पक्षी मृत्युमुखी पडतायत. एम. एन. रॉय अनौपचारिक शिक्षण व संशोधन संस्थेने सर्व्हेतून हा निष्कर्ष मांडलाय. वेगवेगळ्या मार्गांवर वाहनांखाली चिरडून प्राणी, पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. संस्थेने याची दखल घेत नोंदी करण्यास सुरूवात केली. संस्थेच्या पर्यावरण विभागाचे संचालक सुधीर कुंभार यांनी २००२ सालापासून हे काम हाती घेतले. सर्व्हेसाठी त्यांनी कºहाड ते ढेबेवाडी या २५ कि़ मी. रस्त्याची निवड केली. दररोज सकाळी व सायंकाळी या मार्गावरून त्यांचा प्रवास सुरू झाला. प्रवासातच वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या पक्षी, प्राण्याची नोंद करणे, छायाचित्र घेणे व या नोंदी एका वहीत संकलित करून वर्षाअखेरीस त्याचे वर्गीकरण करण्याचे काम डॉ. सुधीर कुंभार यांनी केले. डॉ. कुंभार यांच्यासह अल्केश ओहळ, डॉ. संदेश कांबळे, सुहास पाटील, डी. एम. पाटील, आर. डी. पाटील हे सहाजण २५ कि़ मी. च्या अंतरात दररोज निरीक्षण करून त्याची एकत्रित नोंद ठेवतात. नोंदीनुसार कºहाड-ढेबेवाडी मार्गावर जुलै २००५ ते जुन ०६ अखेर १११ प्राणी व ३९ पक्षी, २००६-०७ अखेर १४५ प्राणी व ५३ पक्षी, २००७-०८ अखेर १७४ प्राणी व ६७ पक्षी, २००८-०९ अखेर १९६ प्राणी व ५५ पक्षी, २००९-१० अखेर १६० प्राणी व ५७ पक्षी, २०१०-११ अखेर १८९ प्राणी व ६२ पक्षी, २०११-१२ अखेर १४८ प्राणी व ५२ पक्षी, २०१२-१३ अखेर १७८ प्राणी व ६४ पक्षी, जुलै २०१३ ते आजअखेर १४० प्राणी व ५१ पक्ष्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. म्हणजेच गेल्या नऊ वर्षांत वाहनाखाली सापडून १ हजार ४४१ प्राणी व ५०० पक्ष्यांना मृत्यू पत्करावा लागलाय.