शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

‘मातोश्री’त बसून गप्पा मारणाऱ्यांनी मोदींवर टीका करू नये, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 12:52 IST

मोदींच्या धोरणामुळेच साखर कारखाने जिवंत!

कऱ्हाड (जि. सातारा) : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे कधी मातोश्रीपासून वरळीपर्यंत तरी गेले होते का? की कधी ते मंत्रालयात गेले? मातोश्रीत बसूनच ज्यांनी कारभार केला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करू नये,’ असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.येथील कल्याणी मैदानावर गुरुवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार प्रवीण दरेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला गेल्यावर काहींनी मणिपूर सांभाळता येत नाही, ते अमेरिकेला गेलेत, अशी टीका केली होती. मात्र, मणिपूर सांभाळायला गृहमंत्री अमित शाह सक्षम आहेत. मातोश्रीवर बसून गप्पा मारणाऱ्यांनी मणिपूरची काळजी करू नये. मोदींनी लस तयार केली, असे मी म्हणालो होतो. आणि मी त्याचे समर्थन करतोय. लसीचा कच्चा माल काही ठरावीक देशांमध्येच उपलब्ध होता. मात्र, मोदींच्या संबंधामुळे तो कच्चा माल भारताला मिळाला. त्यानंतरच शास्त्रज्ञांनी लस तयार केली. १४० कोटी लोकांना मोफत लस मोदींमुळेच मिळाली आहे.’

मोदींच्या धोरणामुळेच साखर कारखाने जिवंत!अडचणीत असलेल्या साखर कारखानदारीला वाचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे धोरण आखले आणि जे निर्णय घेतले, त्या धोरणांमुळेच आता साखर कारखाने आज जिवंत आहेत. साखर कारखानदारी, ऊस उत्पादक यामुळेच वाचली आहे. शेतकऱ्यांच्या विविध विकासासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. केंद्राप्रमाणेच राज्यातील सरकारही आता सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे