सत्राचा निकाल जाहीर न झाल्याने तेराशे विद्यार्थी लटकले

By Admin | Updated: January 30, 2015 23:17 IST2015-01-30T22:42:12+5:302015-01-30T23:17:10+5:30

या महाविद्यालयाचे प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आले नसल्यामुळे निकाल राखून ठेवण्यात आल्याचे कारण विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना दिल जातंय,

Thirteen students hanged because the results of the session were not announced | सत्राचा निकाल जाहीर न झाल्याने तेराशे विद्यार्थी लटकले

सत्राचा निकाल जाहीर न झाल्याने तेराशे विद्यार्थी लटकले

कऱ्हाड : शिवाजी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्वच अभियांत्रिकी महाविद्यालयांचा प्रथम सत्राचा निकाल ‘आॅनलाईन’ जाहीर झालाय; फक्त कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकाल अद्याप लागलेला नाही. या महाविद्यालयाचे प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आले नसल्यामुळे निकाल राखून ठेवण्यात आल्याचे कारण विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना दिल जातंय, तर यामध्ये आमची काहीच चूक नाही, असं महाविद्यालय व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. विद्यापीठ व कॉलेजच्या या ओढाताणीत विद्यार्थी मात्र लटकलेत. कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध शाखांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व अखेरच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १ हजार ३०० आहे. या विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची परीक्षा १७ ते २० डिसेंबर २०१४ दरम्यान संपली आहे. साधारणपणे परीक्षा संपल्यानंतर ४५ दिवसांंत शिवाजी विद्यापीठाकडून सर्वच महाविद्यालयांच्या प्रथम, द्वितीय, तृतीय व अखेरच्या वर्षाचा, प्रत्येक शाखेचा निकाल ‘आॅनलाईन’ जाहीर केला जातो. यंदाच्या
शैक्षणिक वर्षामध्येही डिसेंबरमध्ये प्रथम सत्र संपल्यानंतर निर्धारित कालावधित सर्वच महाविद्यालयांचा निकाल
जाहीर झाला. मात्र, कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा निकाल अद्याप जाहीर झालेला
नाही.

Web Title: Thirteen students hanged because the results of the session were not announced