शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेतून सांगलीच्या सिंचनासाठी तिसऱ्यांदा पाणी सोडले, १०५० क्यूसेकचा विसर्ग 

By नितीन काळेल | Updated: November 24, 2023 15:11 IST

पायथा वीजगृहाचे एक युनीट सुरू 

सातारा : दुष्काळाची स्थितीमुळे कोयना धरणातून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयनेच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून १०५० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. पावसाळ्यापासून सांगलीतील सिंचनासाठी आतापर्यंत तिसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले आहे. तर धरणात सध्या ८५ टीएमसीच साठा शिल्लक आहे.कोयना धरणाचीपाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. या पाण्यावर पिण्याचे पाणी, सिंचन योजना आणि वीजनिर्मितीही अवलंबून आहे. मात्र, यंदा या धरणक्षेत्रात पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ९४ टीएमसीपर्यंतच पोहोचला होता. त्याचबरोबर साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातही पाऊस कमी आहे. यामुळे धरणांतून पाणी सोडण्याची मागणी होत आहे. आताही सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी करण्यात आली. त्यामुळे कोयना धरणातून शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास पाणी सोडण्यात आलेले आहे.पायथा वीजगृहाचे एक युनीट सुरू करुन १०५० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी कोयना नदीपात्रात जात आहे. तर मागील महिन्यातही सांगलीतील सिंचनासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी पायथा वीजगृहातील दोन्ही युनीट सुरू करुन विसर्ग करण्यात आलेला. सध्या सांगलीतील सिंचनासाठी किती पाणी सोडण्यात येणार आहे, याबाबत दुपारपर्यंत निश्चिती नव्हती. तरीही आणखी काही दिवस धरणातून सांगलीतील सिंचनासाठी विसर्ग सुरू राहील, असा अंदाज आहे.

धरण भरले नसल्याने ११.७१ टीएमसी पाणी कपात..जिल्ह्यात यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने कोयना धरण भरले नाही. त्यामुळे सिंचन आणि वीजनिर्मितीच्या नियोजित पाणी वापरात ११.७१ टीएमसी कपात प्रस्तावित करण्यात आलेली आहे. यामध्ये सिंचनाच्या २.८६ आणि वीजनिर्मितीसाठी ८.८५ टीएमसी पाणी कपात असणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीKoyana Damकोयना धरणWaterपाणी