शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशी प्रणवचा मृतदेह पाण्यावर आला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 19:52 IST

Accident Dam Satara : महू धरणात आजोबांबरोबर गुरे चारण्यासाठी गेलेला प्रणव संतोष गोळे (वय ११) या चिमुकल्याचा मृतदेह बुधवारी तिसऱ्या दिवशी सकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आल्याची माहिती करहर औट पोस्टचे ठाणे अंमलदार डी. जी शिंदे यांनी दिली.

ठळक मुद्देतिसऱ्या दिवशी प्रणवचा मृतदेह पाण्यावर आला..! हृदयद्रावक घटना: गोळे कटुंबियांवर दुःखाचा डोंगर

पाचगणी : महू धरणात आजोबांबरोबर गुरे चारण्यासाठी गेलेला प्रणव संतोष गोळे (वय ११) या चिमुकल्याचा मृतदेह बुधवारी तिसऱ्या दिवशी सकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आल्याची माहिती करहर औट पोस्टचे ठाणे अंमलदार डी. जी शिंदे यांनी दिली.महू ता. जावळी येथील धरण परिसरात प्रणव आजोबांच्या सोबत गुरे चारण्यास गेला होता. त्यावेळी नजर चुकवीत पोहण्यासाठी पाण्यात उतरला आणि पाण्यात बुडाला होता. गेले दोन दिवसांपासून ग्रामस्थ व महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान प्रणवचा शोध घेत होते. पोलीस धरणावर ठिय्या मांडून होते. परंतु प्रणवचा कोठेच ठावठिकाणा लागत नव्हता. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रणवचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसला.प्रणवचा मृतदेह सापडल्याचे समजताच संपूर्ण महू गाव धरणाकडे लोटला. यावेळी त्याच्या आई-वडिलांचा व कुटुंबियांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली. आजोबांनी प्रणवला दिलेली हाक शेवटचीच ठरली. येथे जमलेल्या सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले होते. सदर घटनेची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाली आहे.गेले दोन दिवसापासून मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने , कुडाळचे पीएसआय महेश कदम, करहरचे डी. जी.शिंदे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. शिंदे आणि पोलीस पाटील अक्षरशः ठिय्या मांडून होते. उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी ही घटनास्थळी भेट दिली होती.

महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान सुनील बाबा भाटिया, अनिल केळगणे, अनिल लांगी, अमित झाडे, सौरभ साळेकर, आकेश धनावडे, दीपक झाडे, अमित कोळी, अक्षय नाविलकर प्रणवच्या शोधासाठी प्रयत्न करीत आहेत. ग्रामस्थही त्यांना सहकार्य करीत होते. अखेर आज सकाळी प्रणवच्या मृतदेह पाण्यावर तरंगत असताना सापडला. आणि महू गावावर शोककळा पसरली.

टॅग्स :AccidentअपघातDamधरणSatara areaसातारा परिसर