साताऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी घरफोडी, ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 11:53 AM2018-09-04T11:53:11+5:302018-09-04T11:54:33+5:30

सातारा शहर आणि परिसरात सलग तिसऱ्या दिवशीही घरफोडीचे सत्र सुरूच आहे. सोमवारी दुपारी शाहूपुरीत घरफोडी करत सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

For the third consecutive day in Satara, the house collapses, worth Rs. 62 thousand rupees | साताऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी घरफोडी, ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

साताऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी घरफोडी, ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

Next
ठळक मुद्देसाताऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी घरफोडी६२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

सातारा : सातारा शहर आणि परिसरात सलग तिसऱ्या दिवशीही घरफोडीचे सत्र सुरूच आहे. सोमवारी दुपारी शाहूपुरीत घरफोडी करत सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

याबाबत माहिती अशी की, सातारा शहरात शनिवारपासून रोज एक घरफोडी होत आहे. सदरबझार, करंजे, कोडोली आदी परिसरांत घरफोडीच्या घटना घडल्या. सोमवारी महालक्ष्मी कॉलनीत बंद घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या दरवाजाची खालील बाजूची फळी काढून आत प्रवेश केला.

दरवाजाची आतील कडी काढून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

याप्रकरणी शकील इस्माईल बन्ने (रा. बुधवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक फरास करीत आहेत.

Web Title: For the third consecutive day in Satara, the house collapses, worth Rs. 62 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.