सैदापूर येथे घर फोडून दोन लाखांचे दागिने लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:47 IST2021-02-20T05:47:42+5:302021-02-20T05:47:42+5:30

सातारा : सैदापूर (ता. सातारा) येथील बंद घर फोडून चोरट्यांनी २ लाख ४३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून ...

They broke into a house in Saidapur and stole jewelery worth Rs 2 lakh | सैदापूर येथे घर फोडून दोन लाखांचे दागिने लांबविले

सैदापूर येथे घर फोडून दोन लाखांचे दागिने लांबविले

सातारा : सैदापूर (ता. सातारा) येथील बंद घर फोडून चोरट्यांनी २ लाख ४३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी रात्री घडली.

याबाबत दिलीपकुमार विष्णू माने (वय ६४, रा. रयत कॉलनी, सैदापूर, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून १ लाख २० हजार रुपये किमतीचे तीन तोळे सोन्याचे नेकलेस, ४० हजार रुपये किमतीच्या एक तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या साखळ्या, ४० हजार रुपये किमतीच्या एक तोळे वजनाचे सोन्याचे तीन बदाम व तीस हजार रुपये किमतीची चांदीची सहा नाणी चोरट्यांनी लंपास केली.

चाैकट : चोरटे सीसीटीव्हीत कैद

सैदापूर येथे घरफोडी केल्यानंतर चोरटे सातारा बसस्थानकात आले. या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. जेणेकरून चोरट्यांची ओळख पटावी, यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: They broke into a house in Saidapur and stole jewelery worth Rs 2 lakh