प्रशांत रणवरेजिंती: फलटण येथील पिडीत महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी एसआयटी प्रमुख तथा समादेशक राज्य राखीव बल गट क्रं-१ च्या तेजस्वी सातपुते यांनी विशेष तपास पथकामध्ये पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण येथील अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. याबाबतचे आदेश समादेशक तेजस्वी सातपुते यांनी निर्गमित केले आहे. या विशेष तपास पथकामध्ये पुणे ग्रामीण अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, तपास अधिकारी तथा फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे, पुणे ग्रामीण लोणावळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड, कराड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष तपास पथकामध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक झाल्याने तपासाला गती मिळणार आहे.दरम्यानच, या प्रकरणातील आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज, बुधवारी आदेश काढला आहे.
Web Summary : A Special Investigation Team (SIT) has been formed to expedite the investigation into the Phaltan doctor's suicide case. High-ranking police officials from Pune and Solapur have been appointed to the SIT. The accused police sub-inspector has been dismissed from service.
Web Summary : फलटण डॉक्टर आत्महत्या मामले की जांच में तेजी लाने के लिए एक विशेष जांच दल (एसआईटी) का गठन किया गया है। पुणे और सोलापुर के उच्च पदस्थ पुलिस अधिकारियों को एसआईटी में नियुक्त किया गया है। आरोपी पुलिस उप-निरीक्षक को सेवा से बर्खास्त कर दिया गया है।