वरकुटे-मलवडीत दोन ठिकाणी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST2021-06-23T04:25:20+5:302021-06-23T04:25:20+5:30
वरकुटे-मलवडी : वरकुटे-मलवडी ता. माण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल परिसरात राहणाऱ्या शहाबाई आटपाडकर व दरगोबा मंदिर परिसरात राहणाऱ्या पवन ...

वरकुटे-मलवडीत दोन ठिकाणी चोरी
वरकुटे-मलवडी : वरकुटे-मलवडी ता. माण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल परिसरात राहणाऱ्या शहाबाई आटपाडकर व दरगोबा मंदिर परिसरात राहणाऱ्या पवन बनसोडे यांच्याकडे चोरी झाली. मोटरसायकल व एक हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पलायन केले.
याबाबतीत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, यशवंतराव चव्हाण हायस्कूलशेजारी रस्त्याकडेला राहणाऱ्या शहाबाई संदिपान आटपाडकर घरी नसताना रात्री अडीचच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराचा टाळा कटावणीने काढून घरातील पेट्यासह इतर साहित्य बाहेर आणून टाकले. एक हजार रुपयांची रोकड लंपास केली. तेथूनच हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या पवन भिकाजी बनसोडे यांच्या घरासमोरून मोटारसायकल (एमएच ११ सीएक्स १०५४) चोरट्यांनी कुलूप तोडून पळवली. वरकुटे-मलवडीत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे तपास करीत आहेत.