साताऱ्याजवळ पावणेपाच लाखांच्या तांब्याच्या तारेची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:46 IST2021-08-18T04:46:29+5:302021-08-18T04:46:29+5:30

सातारा : सातारा-रहिमतपूर मार्गावरील सावकार कॉलेज ते एनिनन्स अ‍ॅग्रो कोल्ड स्टोअरेजच्या दरम्यान जाणाऱ्या विद्युत वाहिनीतील ४ लाख ७२ हजार ...

Theft of five and a half lakh copper wire near Satara | साताऱ्याजवळ पावणेपाच लाखांच्या तांब्याच्या तारेची चोरी

साताऱ्याजवळ पावणेपाच लाखांच्या तांब्याच्या तारेची चोरी

सातारा : सातारा-रहिमतपूर मार्गावरील सावकार कॉलेज ते एनिनन्स अ‍ॅग्रो कोल्ड स्टोअरेजच्या दरम्यान जाणाऱ्या विद्युत वाहिनीतील ४ लाख ७२ हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरीला गेली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रशांत सहदेव यादव (वय २५, रा. ठक्कर सिटी, गोडोली, सातारा. मूळ रा. तुळसण, ता. कऱ्हाड) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, सातारा-रहिमतपूर रस्त्यावर असणाऱ्या सावकार कॉलेज ते एनिनन्स अ‍ॅग्रो कोल्ड स्टोअरेजच्या अंतरातील विद्युत वाहिनीतील १०८० मीटर लांबीची तांब्याची तार कोणीतरी चोरुन नेली. याची किंमत ४ लाख ७२ हजार ५०० रुपये इतकी आहे.

सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार जाधव हे तपास करीत आहेत.

.............................................................

Web Title: Theft of five and a half lakh copper wire near Satara