शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Satara: विंग येथील चोरी प्रकरण: वेशांतर करत पाठलाग करून पोलिसांनी चोरट्यास कर्नाटकातून घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 14:18 IST

कारवाई दरम्यान स्थानिकांनी व नातेवाईकांनी विरोध करत पोलिसांवर हल्ला करण्याकरीता कुत्रे सोडले

मुराद पटेलशिरवळ : खंडाळा तालुक्यातील विंग येथील एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या भिवंडी येथील गोडाऊनमध्ये घेऊन जाण्याकरीता फ्रीज, वाॅशिंग मशीनसह कंटेनर असा २१ लाख ८७ हजार १५३ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी परराज्यांतील सराईत गुन्हेगार असलेल्या चालकाच्या मुसक्या शिरवळ पोलिसांनी आवळल्या. सलग तीन दिवस कर्नाटकातील बेगम तालाब तांडा येथे वेशांतर करत पाठलाग करून संबंधिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कंटेनरसह १४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विंग येथील एका कंपनीमध्ये उत्पादित होणारे फ्रीज भिवंडी येथील गोडाऊनमध्ये घेऊन जाण्याकरीता कल्याण, ठाणे येथील ट्रान्स्पोर्टतर्फे कंटेनर (एनएल ०१ एडी ००६५) हा १४ जूनला आला होता. कंटेनरमध्ये ५८ फ्रीज, ५६ वाॅशिंग मशीन भरून कंटेनरचालक अशोक वेणू चव्हाण हा १५ जूनला भिवंडीकडे न जाता गायब झाला. याबाबत कंटेनरमालक मनोज सिंह (ठाकूर) यांनी फर्याद दिली होती. त्यानुसार शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.शिरवळचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल बारेला यांच्या पथकाने आनेवाडी, तासवडे टोलनाका, पेठ नाका कोल्हापूर, विजापूर, लमाण तांडे येथील सीसीटीव्हीची तपासणी केली. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना कंटेनरमधील फ्रीज, वाॅशिंग मशीन विजापूर तालुक्यातील लमाण तांडा परिसरात चालक अशोक चव्हाण याने विविध ठिकाणी विकल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी मोहीम राबवत वेशांतर करीत गुन्ह्यात सहभागी असलेल्या अशोक चव्हाण याच्या पाठलाग करीत मुसक्या आवळल्या.अशोक चव्हाण याला अटक करत खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने बुधवारी (दि. ६)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामध्ये संबंधितांकडून शिरवळ पोलिसांनी कंटेनर, फ्रीज, वाॅशिंग मशीनसह १४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई तपास करत आहे.

कुत्र्यांचा हल्ला व सराईत गुन्हेगार जेरबंद..पोलिस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक देसाई, पोलीस अंमलदार तुषार अभंग, अजित बोराटे यांच्या पथकाने सुतावरुन स्वर्ग गाठत कर्नाटकमध्ये अतिसंवेदनशील बेगम तालाब तांडामध्ये कारवाई केली. अशोक चव्हाण हा तेथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वेशांतर करत थरारक पाठलाग केला. यावेळी स्थानिकांनी व नातेवाईकांनी विरोध करत पोलिसांवर हल्ला करण्याकरीता कुत्रे सोडले. मोठ्या शिताफीने पोलिसांनी बचाव करत अशोक चव्हाण याला पकडले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस