शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Satara: विवाहितेला पळवल्याच्या रागातून युवकाच्या वडिलांचा खून; आई, भावावरही चाकूने वार; आरोपीस अटक

By संजय पाटील | Updated: March 14, 2024 16:23 IST

कऱ्हाड : विवाहित महिलेला पळवून नेल्याच्या रागातून युवकाच्या वडिलांचा चाकूने भोकसून खून करण्यात आला. तर आई व भावावरही सपासप ...

कऱ्हाड : विवाहित महिलेला पळवून नेल्याच्या रागातून युवकाच्या वडिलांचा चाकूने भोकसून खून करण्यात आला. तर आई व भावावरही सपासप वार करण्यात आले. सैदापूर, ता. कऱ्हाड येथील अंबक वस्तीवर बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांनी एकाला अटक केले आहे.बाबा आळवंत मदने (वय ५०, मुळ रा. तडवळे-वडूज, ता. खटाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी विजय धर्मा जाधव (वय ५५, सध्या रा. सैदापूर, मुळ रा. शेणोली स्टेशन, ता. कऱ्हाड) याच्यावर गुन्हा नोंद करुन पोलिसांनी त्याला अटक केले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तडवळे येथील बाबा मदने, त्यांची पत्नी इंदू, धाकटा मुलगा अजित हे सैदापुरातील अंबक वस्तीत संतोष देसाई यांच्या गुऱ्हाळगृहावर ऊसतोडीचे काम करतात. तर त्यांचा मोठा मुलगा अक्षय हाही गावातील सुरेश साळुंखे यांच्या गुऱ्हाळगृहावर ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतो. त्याच गुऱ्हाळवर विजय जाधव हा कुटूंबासह मजुरी करतो. गत आठवड्यात अक्षयने विजय जाधव याच्या नात्यातील एका विवाहितेला पळवून नेले. त्याबाबतचा राग त्याच्या मनात होता. त्याच कारणावरुन तो मदने कुटूंबियांना वारंवार शिविगाळ, दमदाटी करीत होता.बुधवारी रात्री विजय जाधव दुचाकीवरुन मदने यांच्या झोपडीजवळ आला. त्याने चिडून जावून इंदू यांच्यावर चाकूने सपासप वार केले. बाबा मदने यांच्या छातीत चाकू भोकसला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अजितवरही त्याने चाकूने वार केले. खून केल्यानंतर आरोपी विजध जाधव हा तेथून निघून गेला. याबाबत कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात विजय जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर तपास करीत आहेत.

आरोपीला पोलिसांनी शिताफीने पकडलेबाबा मदने यांचा खून केल्यानंतर आरोपी विजय जाधव तेथून पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी शिताफीने आरोपीला ताब्यात घेवून अटक केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस