शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त जागा भरण्याचा मार्ग आता मोकळा

By दीपक देशमुख | Updated: February 18, 2026 16:43 IST

झेडपी, पालिकांवरील प्रशासकराज संपुष्टात

दीपक देशमुखसातारा : जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा मांडणाऱ्या जिल्हा नियोजन समितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचेही प्रतिनिधी असतात. परंतु, कार्यकाल संपल्यापासून गेले तीन ते चार वर्षे या जागा रिक्तच होत्या. नुकताच जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका संपल्याने आता तब्बल ४० जागा भरल्या जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडींच्या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!सातारा जिल्हा नियोजन समितीमध्ये खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे ६५ पैकी ३३ सदस्य जिल्हा नियोजन समितीवर निवडून जातात. तसेच नगरपालिकांमधून ५ व नगरपंचायतीमधून २ सदस्य जिल्हा नियोजन समितीवर निवडून जातात. याशिवाय विशेष निमंत्रित १४ सदस्यांची नियुक्ती नियोजन विभाग पालकमंत्र्यांच्या शिफारशीने केली जाते. तथापि, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर यामधून नियुक्त होणाऱ्या तब्बल चाळीस जणांचे नियोजन समितीचे सदस्यत्व संपुष्टात आले.त्यानंतर ओबीसी आरक्षण, राज्यातील सत्ताबदल आदी कारणांमुळे नगरपालिकांच्या निवडणुका चार वर्षे तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका तीन वर्षे लांबणीवर पडल्या. त्यामुळे नियोजन समितीवरील ही ४० पदे रिक्तच होती तर नियोजनच्या बैठकांना केवळ खासदार-आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांचीच उपस्थिती होती.जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नियुक्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा रिक्त असल्याने त्यांच्या भागांना न्याय कोण देणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तथापि, आता पालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या असल्याने नियोजनच्या जागा भरल्या जाव्यात, अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.

गावातील समस्यांची जाणजिल्हा परिषद सदस्यांना गावा-गावातील समस्यांची जाण असते. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा मांडताना तळागाळातील जनतेचा आवाज नियोजन समितीच्या सभागृहात असणे गरजेचे आहे. त्यामुळे ही पदे पूर्ण क्षमतेने भरण्याची गरज आहे.

नगरपालिकांना कमी संख्याजिल्ह्यात ९ नगरपालिकांमध्ये एकूण २३३ नगरसेवक आहेत. यातून अवघे पाच सदस्य निवडून जणार आहेत. तसेच सात नगरपंचायतीतून अवघे दोन सदस्य निवडून जाणार आहेत. सध्या नागरीकरणाचे वाढते प्रमाण पाहता ही संख्या वाढण्याची मागणी होत आहे.

आमदार-खासदारांचाच बोलबालाजिल्ह्यात प्रशासकराज असल्यामुळे गेल्या चार वर्षांत केवळ पालकमंत्री आणि आमदार-खासदारांचाच बोलबाला बैठकांमध्ये दिसून आला आहे. त्यामुळे त्या-त्या भागातील स्थानिक नेत्यांना आमदार तसेच खासदारांकडे पाठपुरावा करून विकासकामांसाठी निधीची मागणी करावी लागत होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara District Planning Committee vacancies to be filled soon after elections.

Web Summary : Satara's District Planning Committee will soon fill 40 vacant positions after local elections. This ensures representation from across the district in development planning, addressing previous imbalances where only officials and representatives were present.