शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

Satara Lok Sabha Election Result 2024: राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला; उदयनराजेंचे कमबॅक

By नितीन काळेल | Updated: June 4, 2024 18:55 IST

सेना आमदारांचे मोठे योगदान..

सातारा : पश्चिम महाराष्ट्रात प्रतिष्ठा आणि चुरशीच्या ठरलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजेंनी आमदार शशिकांत शिंदे यांना पराभूत करत आपणच सातारचे ‘राजे’ असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे भाजपला दुसऱ्या प्रयत्नात का असेना सातारा मतदारसंघात कमळ फुलवता आले, तर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी वाजलीच नाही. या पराभवाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला आहे.लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच सातारा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला. कारण, महायुतीत मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी रस्सीखेच झाली. शेवटी भाजपने जागा ताब्यात घेत उदयनराजे भोसले यांना मैदानात उतरवले, तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे मतदारसंघ होता. पण, विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्याने लढणार कोण हा प्रश्न होता. शेवटी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर शरद पवार यांनी विश्वास दाखवत निवडणूक चुरशीची निर्माण केली. या निवडणुकीत एकूण १६ उमेदवार रिंगणात होते. पण, खरी लढत भाजपचे उदयनराजे आणि राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांच्यातच झाली.निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर भाजप, तसेच राष्ट्रवादीनेही प्रचारात कोणतीच कसर ठेवली नाही. विशेषकरून दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी कऱ्हाड भागावरच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून आले, तर या निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आदींसह राज्यातील दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या. त्यामुळे निवडणुकीत चूरस वाढली, तसेच कोणी उमेदवार जिंकला, तरी त्यांचा काठावरचाच विजय असणार हे स्पष्ट झाले होते. त्याप्रमाणेच सर्व घडून आले. या निवडणुकीत उदयनराजेंनी बाजी मारून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला जोरदार हादरा दिला आहे.

‘वंचित’चा परिणाम फारसा नाही..सातारा लोकसभा मतदारसंघात प्रशांत कदम हे वंचित बहुजन आघाडीकडून उभे होते. पण, त्यांनाही या निवडणुकीत अपेक्षित अशी मते मिळवता आली नाहीत. त्यामुळे विजयी आणि प्रमुख पराभूत उमेदवारावर त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. पण, संजय गाडे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांचे चिन्ह आणि राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांचे तुतारी हे चिन्ह एकसारखेच वाटत होते. त्यामुळे गाडे यांनी शिंदे यांची काही मते आपल्याकडे वळविल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

सेना आमदारांचे मोठे योगदान..सातारा लोकसभेसाठी विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. यामधील दोन आमदार हे शिंदेसेनेचे आहेत. भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विजयात या दोन्ही आमदारांचा मोठा वाटा असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे, तसेच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही उशिरा का असेना निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे भाजप उमेदवाराचा विजय साकारला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा