जलाशयात वॉटर स्कूटर पलटी होऊन पर्यटक बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2022 22:10 IST2022-12-27T22:09:13+5:302022-12-27T22:10:01+5:30
रात्री सातच्या सुमारास एक पर्यटक वॉटर स्कूटर बोटिंग करत असताना त्याची स्कूटर अचानक पलटी झाली.

जलाशयात वॉटर स्कूटर पलटी होऊन पर्यटक बुडाला
- अक्षय गोरे
बामणोली: शिवसागर जलाशयात म्हावशी, ता. जावळी हद्दीमध्ये सायंकाळी सातच्या सुमारास वॉटर स्कूटर बोट पलटी होऊन एक पर्यटक बुडाला. स`थानिक नागरिकांच्या मदतीने संबंधित पर्यटकाचा शोध घेण्यात आला. मात्र, अंधरामुळे शोध कार्यात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे बुधवारी सकाळी शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, म्हावशी ता. जावळी हद्दीतील शिवसागर जलाशयालगत असलेल्या एका टेंट कॅम्पिंगवर मंगळवारी सकाळी कऱ्हाडमधील काही पर्यटक पर्यटनासाठी आले होते. रात्री सातच्या सुमारास एक पर्यटक वॉटर स्कूटर बोटिंग करत असताना त्याची स्कूटर अचानक पलटी झाली. त्यामुळे संबंधित कऱ्हाडचा पर्यटक जलाशयात बुडाला. या प्रकाराची माहिती मेढा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बुडालेला पर्यटक कऱ्हाडमधील असून, त्याचे नाव रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.