शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

महामार्गावरील ‘शॉर्टकट’ ठरताहेत जीवघेणे!, छेदरस्त्यांचा होईना वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 12:08 IST

दुचाकी दुभाजकावर चढवून महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न

कऱ्हाड : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग ओलांडणासाठी छेदरस्ता, पायपूल आहे; पण स्थानिकांनी अनेक ठिकाणी ‘शॉर्टकट’ बनवलेत. संरक्षक जाळीची मोडतोड करून तसेच दुभाजकाचे कठडे फोडून स्थानिक महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करतात. पायी चालत नव्हे, तर चक्क दुचाकी दुभाजकावर चढवून महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न होतोय आणि हाच जीवघेणा प्रयत्न अपघाताला निमंत्रण देणारा ठरतोय.पुणे-बंगळुरू महामार्ग छेदरस्त्याशिवाय ओलांडता येऊ नये, यासाठी सातारा व कोल्हापूर लेनच्या मध्यभागी दुभाजक बांधण्यात आले आहेत. तसेच कऱ्हाडनजीक दुभाजकावर संरक्षक जाळीही उभारण्यात आली आहे. मात्र, तरीही कठडे फोडून तसेच संरक्षक जाळीचे लोखंडी रेलिंग कापून ‘शॉर्टकट’ बनविण्यात आले आहेत. भुयारी मार्ग, छेदरस्ता, पायपुलाकडे जाण्यासाठी वाढीव प्रवास करावा लागतो. त्यामध्ये वेळ जातो. हे टाळण्यासाठीच असे ‘शॉर्टकट’ बनविण्यात आले आहेत. मात्र, महामार्गावरील हे ‘शॉर्टकट’ अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत.‘शॉर्टकट’मधून अचानक कोणीतरी आडवे येते. त्यावेळी चालकाला वाहन नियंत्रित होत नाही आणि पादचारी, दुचाकीस्वाराला धडक देऊन संबंधित वाहन पुढे मार्गस्थ होते. गत दोन वर्षांत असे शेकडो अपघात घडले आहेत. मात्र, तरीही अनेकजण जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडताना दिसतात.

अपघाती ठिकाणेशिवडे फाटा, इंदोली फाटा, उंब्रज फाटा, खोडशी, वहागाव, कोल्हापूर नाका, कोयना वसाहतनांदलापूर फाटा, पाचवड फाटा, मालखेड फाटा

जोडरस्ते बनवले कोणी..?

महामार्गावरून सेवा रस्त्यावर जाण्यासाठी काही अधिकृत जोडरस्ते आहेत. मात्र, महामार्गानजीक अनेक ढाबे, हॉटेल आणि व्यावसायिकांनी अनधिकृतपणे जोडरस्ते बनवलेत. हे जोडरस्तेही अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.

पायपूल असून अडचण, नसून खोळंबाकऱ्हाडमध्ये कोल्हापूर नाक्यानजीक महामार्ग ओलांडण्यासाठी पायपूल आहे. मात्र, या पायपुलाचा क्वचितच वापर होतो. बहुतांश नागरिक धोकादायकरीत्या शॉर्टकटनेच महामार्ग ओलांडतात.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्गAccidentअपघात