शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

दुकानदार महिलेची चूक,..अन् मुलाची अन्ननलिकाच जळाली; साताऱ्यातील धक्कादायक घटना

By दत्ता यादव | Updated: January 28, 2023 16:01 IST

दुकानदार महिलेविरोधात गुन्हा दाखल

सातारा : दुकानात गेलेल्या मुलाने खाऊचे पाकीट मागितले. परंतु दुकानात असलेल्या महिलेने खाऊच्या पाकिटाऐवजी 'ड्रेन इन्स्टा’ दिले. यातील पावडर मुलाने तोंडात घालून पाणी पिले. त्यामुळे काही क्षणातच मुलाची अन्ननलिकाच जळाली. साहिल तानाजी पवार (वय १२, रा. साबळेवाडी, पो. वेण्णानगर, ता. सातारा) असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.

साहिलला धड आता बोलताही येत नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना सातारा तालुक्यातील साबळेवाडी येथे दि. २६ रोजी दुपारी दोन वाजता घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साहिल हा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी सकाळी शाळेत गेला होता. दुपारी तो शाळेतून परत आला. त्यावेळी गावापासून जवळच रस्त्याच्याकडेला असलेल्या एका किराणा दुकानात तो गेला. त्यावेळी दुकानात एक महिला होती. त्या महिलेला त्याने खाऊचे पाकीट मागितले. त्यावेळी त्या महिलेने खाऊच्या पाकिटाऐवजी त्याच्या हातात वाॅश बेशीन स्वच्छ करण्यासाठी वापर करतात ते ‘ड्रेन इन्स्टा’ दिले. हे ड्रेन इन्स्टा घेऊन साहिल घरी गेला. त्यावेळी घरात कोणी नव्हते. त्याने ते पाकीट फोडून संपूर्ण पावडर तोंटात टाकली. त्याचवेळी त्याची जीभ चरचरली म्हणून त्याने एक ग्लास पाणी पिले. अॅसीडयुक्त असलेल्या या पावडरमुळे साहिलची अन्ननलिका जळाली. त्याने आरडाओरड केल्यानंतर त्याचे वडील आणि इतर लोक तेथे आले. त्यांनी साहिलला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.दोन दिवसांपासून त्याला बोलता येत नसल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. मुलाची अशी अवस्था झालेली पाहून वडील तानाजी पवार यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दुकानदार महिलेविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सुनंदा शंकर साबळे (रा. साबळेवाडी, पो. वेण्णानगर, ता. सातारा) या महिलेवर (व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने दुखापत पोहोचवणे) या कलमान्वे गुन्हा दाखल केला.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस