शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: आत्महत्या केलेल्या 'त्या' तरुणीबाबत धक्कादायक माहिती आली समोर, खाकी वर्दीच्या फोटोमुळे गूढ वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 11:34 IST

लोकांची नाराजी दूर करण्यासाठी व सहानुभूती मिळविण्यासाठी तिने खोटे सांगितले

सातारा : मलठण (ता. फलटण) येथील नागेश्वरनगरात आत्महत्या केलेली ऋतुजा सुशांत रासकर (वय २२) ही तरुणी पोलिस नसल्याचे तपासात समोर आले आहे. तिने खाकी वर्दीवर अनेक फोटो काढले असून, ती नातेवाइकांना मुंबई पोलिस असल्याचे सांगत होती. त्यामुळे तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.ऋतुजा रासकर हिने शनिवारी दुपारी नागेश्वरनगरातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ती मुंबई पोलिस दलात कार्यरत असल्याचे समोर आल्यानंतर फलटण शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. ऋतुजा रासकर ही नातेवाइकांना आणि गावातील लोकांना मुंबई पोलिस दलात नोकरी करतेय, असे सांगत होती. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर खाकी वर्दीवरचे फोटो अपलोड करून ती नेहमी प्रकाशझोतात असायची. तिच्या फाॅलाेअर्सची संख्या ५० हजारांच्या आसपास आहे. मुंबई पोलिसांच्या पीसीआर दुचाकीवर बसून तिने फोटो व्हायरल केले होते, तर काही फोटो कोरोनाकाळात एका महिलेला मदत करतानाचे दिसून येत आहेत. या साऱ्या फोटोवरून ती मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे, असेच सगळ्यांना वाटत होते; परंतु फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून ऋतुजा ही पोलिस नसल्याचे समोर आणले. प्रश्न उपस्थित झाला तो तिने अशाप्रकारची खोटी माहिती सगळ्यांना का दिली. तर, या प्रश्नाचे उत्तरही पोलिसांनी शोधून काढले.सहानुभूती मिळविण्यासाठीचऋतुजाने आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे तिच्या घरातले लोक नाराज झाले होते. या लोकांची नाराजी दूर करण्यासाठी व सहानुभूती मिळविण्यासाठी तिने मुंबई पोलिस दलात नोकरी करत असल्याचे म्हणे खोटे सांगितले. ती पोलिस नाही हे तिच्या पतीला माहीत होते. तिने आत्महत्या केल्यानंतर घरात पोलिसाचा बक्कल नंबर आढळून आला. या नंबरवरून पोलिसांनी माहिती घेतली असता तो नंबरही दुसऱ्या एका पोलिसाचा असल्याचे समोर आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस