Satara News: कोल्हापूर नाक्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी काही दिवस बंद
By दीपक शिंदे | Updated: March 13, 2023 17:31 IST2023-03-13T17:31:03+5:302023-03-13T17:31:26+5:30
२० मार्चपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार

Satara News: कोल्हापूर नाक्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी काही दिवस बंद
कऱ्हाड : येथील कोल्हापूर नाक्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी काही दिवस बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती वाहतूक पोलिस तसेच पालिका प्रशासनाने दिली.
शहरातील शनिवार पेठेतील पी. जी. शहा पेट्रोल पंपापासून पश्चिमेला लाहोटी प्लाझासमोरून कऱ्हाड हॉस्पिटल मार्गे शहराबाहेर जाणारा रस्ता मोठ्या प्रमाणात खोदला जाणार आहे. दरम्यान, हा रस्ता काम पूर्ण होईपर्यंत म्हणजेच २० मार्चपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याची माहिती पालिका व पोलिसांनी दिली.
कऱ्हाड पालिकेच्या हद्दीमधील शनिवार पेठेतील लाहोटी प्लाझासमोर पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी बंदिस्त पाइपलाइन करण्याचे काम पालिकेने करण्याचे नियोजित केले आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्या या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. परिणामी, २० मार्चपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.