शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Satara: सुरक्षारक्षकाकडून शिवीगाळ, वारकऱ्यांनी पुणे-पंढरपूर महामार्ग अडवला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 11:21 IST

अर्धा तास महामार्ग बंद ठेवल्याने दोन्ही बाजुंनी वाहतूक कोंडी झाली

विकास शिंदे मलटण : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर फलटण येथील तांबमाळ येथे वखार महामंडळाचे धान्य साठवण इमारतीच्या आवारात येथील सुरक्षा रक्षक व दोन अज्ञात इसम यांनी विठ्ठल रुक्मिणी प्रासादिक भजनी मंडळ मोई, पुणे यांच्या दिंडीतील महिला वारकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. यावेळी वारकऱ्यांनी महामंडळाच्या इमारतीचा रस्ता काटेरी फांद्या टाकून बंद केला. यावरून वारकरी व सुरक्षा रक्षक विजय (पूर्ण नाव नाही) यांच्यात शाब्दिक चकमक झाली. दरम्यानच आणखी एका व्यक्तीने वारकऱ्यांच्या दिशेने दगडफेक केली व पळून गेले. यातील एकास वारकऱ्यांनी पकडून ठेवले. शिवीगाळ व दगडफेक केल्याने संतप्त वारकऱ्यांनी पुणे-पंढरपूर महामार्गावरच ठिय्या मांडला. जोपर्यंत या सुरक्षारक्षकास पकडून त्यावर कारवाही करत नाही तो पर्यंत महामार्ग मोकळा करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. या ठिकाणी दहा ते पंधरा मिनिटात पोलिस दाखल झाले. तरीही वारकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. साधारण अर्धा तास महामार्ग बंद ठेवल्याने दोन्ही बाजुंनी वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक नागरिक व पोलिस यांनी उचित कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वारकऱ्यांनी महामार्ग खुला केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPoliceपोलिस