शहरं
Join us  
Trending Stories
1
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
2
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
3
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
4
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
5
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
6
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
7
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
8
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
9
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
10
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
11
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
12
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
13
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
14
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
15
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
16
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
17
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
18
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
19
WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी
20
याला म्हणतात ढासू शेअर...! 5 वर्षांत 2 रुपयांच्या स्टॉकनं केलं करोडपती, दिला 93806.67% चा बंपर परतावा
Daily Top 2Weekly Top 5

Satara-Local Body Election: विरोधकाला मत देईन; पण..; उमेदवारांमधील जुन्या वादांचे सावट पुन्हा गडद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 17:36 IST

नाराजीचा परिणाम निवडणूक समीकरणांवर

दत्ता यादवसातारा : सातारा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांमधील जुन्या वादांचे सावट पुन्हा गडद होताना दिसत आहे. पूर्वी किरकोळ कारणांवरून झालेल्या भांडणांचा, कार्यकर्त्यांच्या पळवापळवीचा, कामाचे श्रेय घेण्याच्या स्पर्धेचा आणि निधी वाटपावरून निर्माण झालेल्या नाराजीचा परिणाम आता सरळ निवडणूक समीकरणांवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.या निवडणुकीत सातारा विकास आघाडी आणि नगरविकास आघाडीमध्ये मनोमिलन झाल्याने चुरस कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, आघाडीतल्या काही माजी नगरसेवकांमधील पूर्वीचे वाद पूर्णपणे मिटले नसल्याचे आता उघड होत आहे. पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचलेले वाद, एकमेकांविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारी आणि त्या काळात निर्माण झालेला राग अद्यापही कायम असल्याचे पक्षांतर्गत हालचालींवरून जाणवू लागले आहे.वरिष्ठ नेते एकजूट दाखवत असले तरी तळागाळातील मतफोडीची हालचाल सुरू झाली असून त्याची झळ थेट उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, एका माजी नगरसेवकाच्या कुटुंबातील सदस्याकडून सत्ताधारी नगरसेवकाला ‘तीन डिसेंबरला पाणी पाजणार’ असा उल्लेख असलेला मेसेज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या संदेशामुळे आघाडीत पाडापाडीचे राजकारण जोर धरण्याची चिन्हे अधिक स्पष्ट झाली आहेत.जुने वाद विसरून निवडणुकीला सामोरं जाण्याचे आवाहन पक्षनेते करीत असले तरी अंतर्गत कलह थांबलेला नाही. त्यामुळे या निवडणुकीत अधिकृत आघाडीपेक्षा अंतर्गत मतफोडीचे राजकारणच निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. अशी परिस्थिती कायम राहिली, तर निवडणुकीचा कल अगदी अनपेक्षित दिशेने वळण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे.प्रभाग रचनेमुळे वाॅर्डाची अदलाबदलनिवडणुकीपूर्वी प्रभाग रचनेमध्ये अदलाबदल झाली. त्यामुळे अनेक वर्षे एकाच वाॅर्डमध्ये आपले बस्तान बसविलेल्या प्रस्थापित नगरसेवकांना दुसऱ्या वाॅर्डात जाऊन आपल्या पारड्यात मत मिळविणे फार जिकिरीचे ठरणार आहे. त्यातच कधी काळी विरोधकांसोबत झालेल्या वादाचाही आघाडीतील काही उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे.विरोधकाला मत देईन; पण ‘त्याला’ नाहीजुन्या किरकोळ वादामुळे निवडणुकीत पाडापाडीचे राजकारण सुरू आहे. आपला पूर्वीचा मित्र व सध्याच्या दुश्मनाला कोणत्याही परिस्थितीत मत द्यायचे नाही. असं म्हणे अनेकांनी ठरलंय. एकवेळ विरोधकाला मत देईन पण त्याला (दुश्मनाला) देणार नाही, असा निश्चय अनेकांनी केला असल्याचे बोलले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Local Elections: Old rivalries resurface, threatening alliance stability.

Web Summary : Satara's local elections are seeing old rivalries disrupt alliances. Past disputes and internal conflicts threaten to undermine the unity displayed by senior leaders. Ward boundary changes and voter resentment may lead to unexpected outcomes.