शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्ट दिली नाही म्हणून रागाच्या भरात शेजाऱ्याची दुचाकीच पेटवली, एकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 13:47 IST

येता-जाता त्याने लिफ्ट मागितल्याने जाधव यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे त्याने ‘तुझ्या गाडीला पण दाखवितो आणि तुला पण’, अशी धमकी दिली होती. मात्र, याकडे जाधव यांनी दुर्लक्ष केले.

सातारा : येता-जाता नेहमी दुचाकीवरून इकडे सोड, तिकडे सोड म्हणणाऱ्या शेजाऱ्याला दुचाकीवरून लिफ्ट दिली नाही म्हणून रागाच्या भरात त्याने शेजाऱ्याची दुचाकीच पेटवून दिली. ही धक्कादायक घटना साताऱ्यातील सदर बझारमधील कांगा काॅलनीत काल, शुक्रवारी (दि.६) मध्यरात्री घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. महेश मोरे (वय ४२, रा. सदर बझार सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदर बझारमधील कांगा काॅलनीत राहणारे संजय जाधव हे साताऱ्यातील एमआयडीसीमध्ये काम करतात. त्यांच्याच शेजारी महेश मोरे राहतो. येता-जाता त्याने लिफ्ट मागितल्याने जाधव यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे त्याने ‘तुझ्या गाडीला पण दाखवितो आणि तुला पण’, अशी धमकी दिली होती. मात्र, याकडे जाधव यांनी दुर्लक्ष केले.दरम्यान, शुक्रवारी रात्री साडेतीनच्या सुमारास महेश मोरे याने संजय जाधव यांची दुचाकी पेटवून दिली. खिडकीमध्ये मोठा प्रकाश पडल्याने जाधव यांच्या आईला जाग आली. त्यांनी झोपेतून उठून पाहिले असता दुचाकी पेटल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. त्यांच्या ओरडण्याने संजय जाधव व त्यांचे भाऊही झोपेतून उठले. या दोघांनी घरातील पाणी आणून ही आग विझविली. त्यावेळी मोरे हा तेथून पळून जाताना जाधव व त्यांच्या आईला दिसला. यामध्ये जाधव यांचे ४० हजारांचे नुकसान झाले आहे.जळतं फडकं पुरावादुचाकी पेटविण्यासाठी टाकलेले फडके हे मोरे याचेच असल्याचे जाधव यांनी ओळखले. हे फडकेही त्यांनी पुरावा म्हणून स्वत:जवळ ठेवले आहे. या प्रकारानंतर संजय जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या घटनेनंतर मोरे हा पसार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत महिला पोलीस नाईक एस. आर. सपकाळ या अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआगCrime Newsगुन्हेगारी