शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
2
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
3
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
4
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
5
शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
6
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
7
Municipal Corporation Election 2026 LIVE Updates: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४१.०८ टक्के मतदान; पहा कुठे किती मतदान झाले?
8
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
9
'ट्रम्प' धोरणांचा दुहेरी फटका! व्हिसा स्टॅम्पिंगमध्ये होणाऱ्या विलंबामुळे भारतीयांना नोकऱ्या जाण्याची भीती
10
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
11
"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका
12
रशियाच्या रडारवर दोन युरोपियन देश; पुतीन यांच्या डोळ्यात का खुपत आहेत ब्रिटन आणि जर्मनी?
13
धुळे महापालिका निवडणूक: प्रभाग १८ मध्ये राडा, EVM ची तोडफोड, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
14
I-PAC Raid Case: सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका; आय-पॅक प्रकरणात धाडली नोटीस!
15
ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले
16
BSNL चा 'महाधमाका'! हाय-स्पीड WiFi प्लॅनवर २०% सवलत; ५००० GB डेटासोबत OTT देखील मोफत!
17
संसार मोडला अन् आयुष्यही संपवलं! पत्नी ४ मुलांसह गायब; संतापलेल्या पतीने सासरच्या दारातच स्वतःला पेटवले
18
'या' महाराणीनं भारत-चीन युद्धात देशासाठी दान केलेलं ६०० किलो सोनं, खासगी विमानं, विमानतळ; घराण्याकडे होती अफाट संपत्ती
19
"मला राजकारण कळत नाही, वरचे निर्णय घेतात', मतदानाच्या दिवशीच सुभाष देशमुखांचा भाजपाला घरचा आहेर
20
IND vs PAK T20 World Cup: तिकीट बुकिंगसाठी चाहत्यांची ऑनलाईन गर्दी; वेबसाइटच झाली क्रॅश; अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच म्हणतोय, “मला मतदान करू नका!”, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 14:07 IST

कराड मध्ये चक्क स्वत: उमेदवार सांगतोय मला मतदान करू नका. उमेदवारी देताना खुल्या वर्गावर राजकीय पक्षांनी केलेला अन्याय व निवडणुकीच्या माध्यमातून अपप्रवृत्तीचा होत असलेला शिरकावा यातूनच अपक्ष उमेदवार ॲड. श्रीकांत घोडके यांनी पोटतिडकीने निर्णय घेतला आहे.

सातारा- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. कराड नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. प्रचार सभा जोरदार सुरू आहेत, कराड येथील एका उमेदवाराचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक उमेदवार लोकांना मला मतदान करु नका असे सांगत असल्याचे दिसत आहे.

५० खोके हे सत्यच, संतोष बांगरांना एकनाथ शिंदेंनी ५० कोटी दिले; भाजपा आमदाराचा खळबळनजक दावा

कराड मध्ये चक्क स्वत: उमेदवार सांगतोय मला मतदान करू नका. उमेदवारी देताना खुल्या वर्गावर राजकीय पक्षांनी केलेला अन्याय व निवडणुकीच्या माध्यमातून अपप्रवृत्तीचा होत असलेला शिरकावा यातूनच अपक्ष उमेदवार ॲड. श्रीकांत घोडके यांनी पोटतिडकीने निर्णय घेतला आहे.  मला मतदान करू नका असे ते प्रचार करत मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.

दरम्यान, त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी या प्रचाराचे कारणही सांगितले आहे. "कराड नगरपालिकेत २५ वर्षानंतर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी खुले असताना याठिकाणी भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षाने  नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी उमेदवार देऊन आम्हा मराठ्यांवर अन्याय केलेला आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेवर नाराजी व निवडणुकीच्या माध्यमातून अपप्रवृत्तीचा होत असलेला शिरकावा सहन होत नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे  नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार ॲड. श्रीकांत घोडके यांनी सांगितले. 

तब्बल २५ वर्षांनंतर खुल्या प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद

कराड पालिका निवडणुकीसाठी १५ प्रभागांतून ३१ नगरसेवक तर थेट जनतेतून १ नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. तर तब्बल २५ वर्षांनंतर खुल्या प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद आरक्षित झाल्याने निवडणुकीत इच्छुकांची भाऊगर्दी निर्माण झाली आहे.पालिकेच्या निवडणुकीत भाजप व काँग्रेस स्वबळावर रिंगणात उतरले आहेत तर दोन्ही राष्ट्रवादी व शिंदेसेना यांनी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणे पसंत केले आहे. या सगळ्यांकडेच इच्छुकांची मोठी संख्या होती. पण पक्षाची व आघाडीची उमेदवारी देताना सर्वांचेच समाधान होऊ शकलेले नाही. त्यामुळे अनेक अर्ज अपक्ष म्हणून शिल्लक राहिले आहेत. पण यातील अनेकजण बंडाची भाषा बोलू लागल्याने त्यांना थंड करण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Karad mayoral candidate urges: Don't vote for me! Why?

Web Summary : In Karad, an independent mayoral candidate, Shrikant Ghodke, is campaigning *against* himself. He cites injustice towards the Maratha community by major parties fielding OBC candidates for the open-category mayoral post after 25 years and displeasure with corruption in elections as his reasons.
टॅग्स :satara-acसाताराElectionनिवडणूक 2024Social Viralसोशल व्हायरल