शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील तरुणांना नोकरीच्या आमिशाने गंडा घालणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात, वर्षभरापासून देत होता गुंगारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 12:10 IST

बोरगाव पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस त्याचे घर आहे. असे असताना तो पोलिसांना अद्यापही सापडत नव्हता.

नागठाणे : साताऱ्यातील तरुणांना वन विभागात नोकरी लावतो म्हणून अकरा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्याला बोरगाव पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली. राजेश नंदकुमार शिंदे असे अटक केलेल्याचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, गणेश कृष्णा चव्हाण (वय २९, रा. सदर बझार, सातारा) यांना कऱ्हाड येथे वनपाल म्हणून नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून राजेश नंदकुमार शिंदे (३२, रा. बोरगाव, ता. सातारा) याने साडेतीन लाख रुपये घेतले. तसेच गणेश चव्हाण यांच्याप्रमाणेच इतर चार तरुणांनाही अशाच पद्धतीने आमिष दाखवून त्यांच्याकडूनही राजेश शिंदे याने पैसे उकळले. या पाच तरुणांची एकूण अकरा लाखांची फसवणूक झाली होती. हा प्रकार दीड वर्षांपूर्वी घडला होता. संबंधित तरुणांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात याविषयी तक्रार दिली होती. परंतु, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी राजेश शिंदे हा फरार झाला. बोरगाव पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस त्याचे घर आहे. असे असताना तो पोलिसांना अद्यापही सापडत नव्हता.याबाबत ‘लोकमत’मधून सोमवारी वृत्त प्रसिद्ध झाले. यामुळे खडबडून जागे झालेल्या बोरगाव पोलिसांनी सोमवारी सकाळीच राजेश नंदकुमार शिंदे याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर बोरगाव पोलिसांनी त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस