शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

कमळाला घड्याळाचे काटे टोचू लागले, ‘काका’ शांत, नरेंद्र पाटलांनी बोलून टाकले

By दीपक देशमुख | Updated: April 13, 2024 16:17 IST

महायुतीत सातारच्या जागेसाठी नेत्यांची अजूनही खलबते, धुसफूस सुरूच

दीपक देशमुखसातारा : महायुतीच्या सातारा लोकसभा जागेच्या उमेदवारीबाबत घटक पक्षाच्या नेत्यांची अजूनही खलबते सुरू आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात नितीन पाटील यांच्या उमेदवारीची खात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे. तर भाजपानेही शक्तिप्रदर्शन व महायुतीचे मेळावे घेतले आहेत; परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याकडे पाठ फिरवल्याने घड्याळाचे काटे कमळाला टोचू लागल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे नरेंद्र पाटील यांनीही आपल्याला उमेदवारीबाबत अद्याप अपेक्षा असल्याचे मत व्यक्त केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडखोरी करून महायुतीत प्रवेश केल्यानंतर सातारासह इतर चार जागांवर दावा सांगितला होता. तेव्हापासूनच राष्ट्रवादीतून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली. अखेर त्यांचेच नाव राष्ट्रवादीकडून निश्चितही झाले; परंतु या जागेवर उदयनराजेंचाही दावा असल्याने उमेदवारीसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. इतर जागांबाबत तोडगे निघत साताऱ्याचा तिढा राज्यातही गाजला.उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन राजकीय कौशल्य पणाला लावले; तसेच दिल्लीहून येताच शक्तिप्रदर्शन करीत आपली उमेदवारी असल्याचे जाहीर केले; परंतु त्यांच्या उमेदवारीबाबत अद्याप राज्यातील नेते दिल्लीकडे बोट दाखवत आहेत. तर राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीत उमेदवारी निश्चित हाेत असतानाही भाजपाकडून ताणून धरले गेल्याने राष्ट्रवादीच्या गोटातही नाराजीचा सूर आहे. निर्णय झाला नसल्याने त्यांचीही प्रचारासाठीची आगेकूच थांबली आहे.

महायुतीचे आणखी एक दावेदार नरेंद्र पाटील यांनीही व्यासपीठावरच आपली दिल्लीत ताकद कमी पडल्याचे बोलून दाखवत आपल्याला उमेदवारीबाबत आशा असल्याचे म्हंटले होते. या प्रमुख दावेदारांशिवाय जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढली असल्यामुळे पडद्याआडूनही अनेकांनी फिल्डिंग लावलीय. त्यांचा जिल्ह्यात नसला तरी त्यांच्या भागापुरता राजकीय प्रभाव आहे. त्यांना शांत करता आले नाही तर या अटीतटीच्या झुंजीत महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. हे जाणून सर्वांचे रुसवेफुगवे काढून अगोदर महायुतीच्या वरातीमध्ये सामील करायचे आणि यानंतरच उमेदवारीचा मुहूर्त काढण्याचा प्रयत्न सध्या तरी दिसतो आहे.दाढी टोचणार की, गुदगुल्या होणार?वाढदिवशी शुभेच्छा द्यायला आलेल्या शिवेंद्रराजेंची दाढी टोचते असे जरी उदयनराजे भोसले मिश्कीलपणे म्हणाले होते. शिवेंद्रराजेंची दाढी खरंच टोचणार की गुदगुल्या करणार, हे उमेदवारीबाबत निर्णय झाल्यानंतरच समजणार आहे. कारण दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांच्याप्रमाणे पक्षनिष्ठेला प्राधान्य देत अधिकृत उमेदवाराच्या पाठीमागे ताकद उभी करणार असल्याचे संकेत शिवेंद्रराजे यांनी दिले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले