शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

..म्हणून सरकार निवडणुका पुढे ढकलतंय, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 11:28 IST

राज्यात ‘हात जोडो’ अभियानाची तयारी सुरू

सातारा : ‘राज्यात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आली असल्याने अस्थिर परिस्थिती आहे. त्यातच स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र येऊन लढविणार आहे. त्यामुळे राज्य सरकार निवडणुका घेण्याचे धाडस न दाखवता सतत पुढे-पुढे ढकलत आहे,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.सातारा येथे काँग्रेस समितीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘राज्यातील सरकार राहणार की जाणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे धाडस सरकारकडून होत नाही. राज्यपाल नियुक्त १२ आमदार करायचे आहेत; पण अंतर्गत वादामुळे त्यांची निवड करता येत नाही. त्यातच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अतिवृष्टीतील पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. नियमित पीक कर्जदार शेतकऱ्यांना लाभ दिला जात नाही. त्यामुळे राज्यात सरकार आहे की नाही तेच कळत नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.राज्यात ‘हात जोडो’ अभियानाची तयारी सुरूविकासात राज्य मागे पडत आहे. केंद्राच्या हस्तक्षेपामुळे प्रकल्प गुजरातमध्ये जातात. त्यातच सरकारवर विश्वास नसल्याने अनेक प्रकल्प राज्यात येत नाहीत, असे सांगून चव्हाण पुढे म्हणाले, ‘काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा ‘न भूतो न भविष्यती’ अशी ठरत आहे. लवकरच ती संपणार असून, त्यानंतर काँग्रेस देशात ‘हात जोडो’ अभियान सुरू करत आहेत. महाराष्ट्रातही या अभियानाची तयारी सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElectionनिवडणूक